दिघी पोलिस स्टेशन वरिष्ठ पोलीस निरीक्षक बापूसाहेब ढेरे यांचा सत्कार.
गणेशोत्सव मंडळ बैठक उत्साहात
आळंदी येथील दिघी पोलिस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक पदी बापूसाहेब ढेरे यांची नियुक्ती झाली असून त्यांनी पदभार स्वीकारत गणेशोत्सव मंडळ पदाधिकारी, शांतता कमेटी सदस्य, पदाधिकारी यांची बैठक घेत गणेशोत्सव शांतातेत उत्साही आनंदात साजरा करण्यासह दक्षता घेण्याचे सूचना देत मार्गदर्शन केले. गणेशोत्सव मंडळ बैठक उत्साहात पार पडली.
नवनियुक्त वरिष्ठ पोलीस निरीक्षक बापूसाहेब ढेरे यांचा तसेच महाराष्ट्र राज्य पोलीस मित्र वेल्फेअर असोशिएशन अध्यक्ष पदी रवींद्र जाधव यांची नियुक्ती झाल्या बदल विविध सेवाभावी संस्थाचे पदाधिकारी यांचे वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला.
यावेळी आळंदी धाम सेवा समिती अध्यक्ष राहुल चव्हाण, आळंदी जनहित फाउंडेशन कार्याध्यक्ष अर्जुन मेदनकर, रोहिदास कदम, ज्ञानेश्वर घुंडरे, अनिल जोगदंड, वैभव दहिफळे, किरण कोल्हे, भागवत काटकर,उदय काळे, कैवल्य टोंपे, निलेश कापडे, मयुर गिल, दादासाहेब नाळे, प्रकाश ऊगाडे, गोविंद पांचाळ, बाबासाहेब भंडारी, औन्ध देवस्थानचे पुजारी देशपांडे आदी मान्यवर यांनी शुभेच्छा दिल्या. पोलीस मित्र वेल्फेअर फाउंडेशन ऑफ इंडिया राज्य अध्यक्ष रवींद्र जाधव यांचा महाराष्ट्र अध्यक्ष पदी निवडी निमित्त बापूसाहेब ढेरे यांचे हस्ते सत्कार करण्यात आला.
तत्पूर्वी गणेशोत्सव मंडळांचे पदाधिकारी, कार्यकर्ते यांना शांततेत गणेशोत्सव साजरा करण्याचे आवाहन करीत गणेशोत्सवात कायदा सुव्यवस्था कायम राहावी यासाठी मार्गदर्शन केले. विविध सूचना देत त्यांनी मार्गदर्शन केले. यावेळी मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते.
यावेळी त्यांनी परिसरातील समस्यां, अडचणी जाणून घेत उपस्थितांशी सुसंवाद साधला. पोलीस प्रशासन गणेश मंडळांना सर्वोतोपरी सहकार्य मात्र गणेशोत्सव साजरा करणाऱ्या मंडळांनी कायम सुसंवाद ठेवावा असे आवाहन त्यांनी केले.