सत्यविचार न्यूज :
कनेरसर ता.खेड येथील ठाकर समाजाच्या घरांचे नुतनीकरण पुर्णत्वास
कनेरसर ता.खेड येथील आदिवासी ठाकर समाजातील ८५ कुटुंब घरांची स्लॅबगळती,लिकेज यामुळे गेली सात ते आठ वर्षे हैराण झाले होते.पावसाळ्यात अक्षरक्षः घरात आतून प्लास्टीक कागद बांधून कसे तरी दिवस ढकलले जात होते.
सामाजिक कार्यकर्ते अशोकराव टाव्हरे,सरपंच सुनीता केदारी,यात्रा कमिटी अध्यक्ष दिलीपराव माशेरे,माजी ग्रामपंचायत सदस्य ज्ञानेश्वर शिंदे व समाजबांधव यांनी एमआयडीसी व खेड सिटीला निवेदने पाठविली.
एमआयडीसीच्या प्रादेशिक अधिकारी डाॅ.अर्चना पठारे यांच्याबरोबर बैठका झाल्या.ठाकर समाजाची घरे संपादित झाल्याने त्यांना खेड सिटीने घरे बांधून दिली,परंतु काही वर्षातच घरांची दुरावस्था झाली होती.निवेदन व चर्चेने न्याय मिळत नाही म्हणून दि.२९ फेब्रुवारी २०२४ रोजी अशोकराव टाव्हरे यांच्या मार्गदर्शनानुसार आदिवासी ठाकर समाजाच्या ५० बाधितांनी एमआयडीसी कार्यालय येथे तीव्र आंदोलन केले.आंदोलनाची तातडीने दखल घेऊन प्रादेशिक अधिकारी डाॅ.अर्चना पठारे यांनी एमआयडीसी व खेड सिटीला दि.५ मार्च रोजी कनेरसर येथील आर.आर.काॅलनीची स्थळपाहणी करण्याचे लेखी आदेश दिले.त्यातून अहवाल कार्यकारी अभियंता (प्रकल्प ) एमआयडीसी,चिंचवड पुणे यांना पाठविला गेला.त्यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी,खेड सिटीला तातडीने घरदुरूस्तीचे निर्देश दिले.
खेड सिटीने सीओईपी पुणे यांच्याकडून स्ट्रकचरल ऑडीट केले व ८५ घरांच्या नुतनीकरणासाठी दिड कोटींचा निधी मंजुर केला व जुनमध्ये प्रत्यक्ष कामास सुरूवात झाली. बहुतांश घरांचे काम पुर्णत्वास आले आहे.रहिवाशांनी पाणी गळती पुर्ण थांबली आहे.टेरेस वाॅटर प्रुफींग,भिंतीना गेलेले तडे,लिकेज ही कामे थांबल्याचे सांगितले.
एमआयडीसीचे अधिकारी,खेड सिटी इन्फास्ट्रक्चर कंपनीचे सीईओ कृष्णा,उपाध्यक्ष शाम देशपांडे व अधिकारी यांच्या सहकार्यातून घरांच्या नुतनीकरणाची कनेरसर येथील ठाकर समाजाला ही एक अनमोल भेट मिळाली.