विश्व हिंदू परिषद बजरंग दल खेड ग्रामीण प्रखंडचा वतीने शिरोली येथे हिंदू संमेलन मोठ्या उत्साहात साजरे
सत्यविचार न्यूज :
विश्व हिंदू परिषदेच्या षष्टीपूर्ती चा निमित्तानं देशभरात हिंदू संमेलन साजरी करण्यात येत असतानाच खेड तालुक्यातील विश्व हिंदू परिषद ग्रामीण प्रखंडचा वतीने शिरोली येथील आज दिनांक 1 सप्टेंबर 2024 रोजी जाखमाता मंगल कार्यालय येथे हिंदू संमेलन मोठ्या उत्साहात साजरे करण्यात आले.
या हिंदू संमेलनासाठी प्रमुख वक्ते म्हणून प.म. प्रांत धर्मप्रसार प्रमुख मृणालिनीताई पडवळ यांनी विश्व हिंदू परिषदेची कार्य आणि मांडणी केली आणि वक्ते प.म. प्रांत धर्मयात्रा महासंघ प्रमुख श्री अशोकजी येलमार यांनी हिंदूंची सध्यस्थिती बांगलादेश, पश्चिम बंगाल आणि केरळ या ठिकाणी हिंदूंवर होणारे अत्याचार लव्ह जिहाद, लँड जिहाद गोहत्या आदी विषयांवर सद्य परिस्थिती सांगितली.
या कार्यक्रमासाठी माजी प्रांत मंत्री विजयराव देशपांडे, आदी योगी महाराज , मानद पशुकल्याण अधिकारी ऍड निलेशजी आंधळे, भीमाशंकर जिल्हा सहमंत्री सुमितजी शिनगारे, सहसंयोजक अवधूतजी चौधरी, सह गोरक्षा प्रमुख दिपकजी गावडे उपस्थित होते.सदर कार्यक्रमासाठी सुमारे 500च्या वर संख्या होती.
हिंदू संमेलनाचे सूत्रसंचालन मयूर लोहोट यांनी केले, प्रस्तावना आणि आभार प्रदर्शन खेड ग्रामीण प्रखंड मंत्री स्वप्नीलजी साळुंके यांनी केले.
हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी विशाल टाकळकर, विनोद लोहोट, योगेश पवार, किरण जाधव, दादू पोखरकर ,ऋतुराज वाडेकर, समीर वाडेकर, नामा भोकसे, विठ्ठल पिंगळे, अभि पवार, शेखर वाळुंज,गणेश गुरव, प्रशांत आवटे, अनिकेत वाळुंज, वैभव राळे, अण्णा महाराज शिंदे,अक्षय जाधव, मछिंद्र रौंधळ, सायलीताई पंडित आणि उषाताई टोपे यांनी प्रयत्न केले.
संमेलनासाठी जिल्हा मंत्री संतोष खामकर, अध्यक्ष प्रशांत काळे मातृशक्ती संयोजिका वैशालीताई लांडगे, भाजप जिल्हाध्यक्ष शरदभाऊ बुट्टे , मी सेवेकरी फौंडेशन चे सुधीरभाऊ मुंगसे यांनी भेट दिली.
अश्वमेघ फाऊंडेशन चे अक्षय जाधव यांचे सहकार्य लाभले.
त्रिवार ओंकार आणि विजयमंत्राने कार्यक्रमाची सुरुवात झाली, प्रेरणामंत्र आणि पसायदानाने कार्यक्रमाची सांगता झाली.