महाळुंगे येथील ज्ञानवर्धिनी शाळेच्या प्रांगणात ९ वा आंतराष्ट्रीय योगादिन उत्साहात साजरा करण्यात आला. इयत्ता प्री प्रायमरी ते १० वी च्या विद्यार्थ्यांनी सूर्यनमस्कार, विविध आसन, मुद्रा, प्राणायाम याची प्रात्याक्षिके सादर केली. तसेच विविध चित्रे व पोस्टरच्या माध्यमातून योगासनाचे महत्व पटवून दिले आणि दररोज योगाचा सराव करण्याचा निश्चय केला. शाळेचे सेक्रेटरी योगेश रोकडे यांनी कार्यक्रमाचे अध्यक्षपद स्थान स्वीकारून आजच्या धावपळीच्या जीवनात विद्यार्थ्यांना मेडिटेशनचे महत्व पटवून देऊन स्वस्थ व निरोगी शरीरासाठी नियमित योगासन करण्याचा सल्ला दिला. या कार्यक्रमाचे आयोजन ज्ञानवर्धिनी इंग्लिश मिडीयम स्कुलच्या क्रीडा व संस्कृतिक विभागाने केले अशी माहिती शाळेच्या मुख्याध्यापिका वंदना रोकडे यांनी दिली. शाळेचे संस्थापक अविनाश शिवळे पाटील व डायरेक्टर रोहिदास रोकडे यांनी विद्यार्थी व शिक्षकांना योग दिनाच्या शुभेच्छा दिल्या.