शिवसेनाप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त शालेय विद्यार्थ्यांना वह्यांचे वाटप
सत्यविचार न्यूज :
राजगुरूनगर : महाविकास आघाडीच्या वतीने शिवसेनाप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त शालेय विद्यार्थ्यांना वह्यांचे वाटप करण्यात आले.
कडूस गटातील जवाहर विद्यालय चास आणि वाडा येथील कर्मवीर भाऊराव पाटील विद्यालय, राम जनार्दन कांडगे कनिष्ठ महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना महाविकास आघाडीच्या वतीने वह्यांचे वाटप करण्यात आले. मी सेवेकरी सोशल फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष सुधीर मुंगसे, शिवसेना नेते संजय घनवट यांच्या वतीने या वह्यांचे वाटप करण्यात आले.
यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे तालुकाध्यक्ष हिरामण सातकर, शिवसेना ठाकरे गटाचे जिल्हा प्रमुख अशोक खांडेभराड, राष्ट्रवादी शरदचंद्र पवार युवक काँग्रेसचे अध्यक्ष विशाल झरेकर, राजगुरूनगर बँकेच्या संचालिका विजया शिंदे, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या उपाध्यक्षा मनीषा सांडभोर, सेनेचे तालुका समन्वयक व माजी सभापतो अमोल पवार, जिल्हा परिषद सदस्या तनुजा घनवट, कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक सोमनाथ मुंगसे, सेनेचे खेड तालुका प्रमुख रामदास धनवटे,आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी बोलताना सुधीर मुंगसे म्हणाले की, शिवसेनाप्रमुख उद्धव ठाकरे यांचा वाढदिवस हा महाविकास आघडीच्या वतीनं एकत्रित साजरा केला जातोय. केवळ राजकारण न करता सामाजिक बांधिलकी म्हणून या निमित्ताने विद्यार्थ्यांना वह्या वाटप करण्यात आल्यात. येणाऱ्या काळातही राजकारणाच्या पलीकडे सामजिक जाणिवेतून मी सेवेकरी फाउंडेशन आणि महाविकास आघडीच्या वतीनं हे उपक्रम राबविले जातील.