चाकणला विद्यानिकेतन शाळेत विद्यार्थ्यांची वृक्षदिंडी व वृक्षारोपण,
चाकण : प्रतिनिधी
‘ वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे ‘ अंतर्गत श्री.एस. पी. देशमुख शिक्षण संस्थेच्या येथील विद्यानिकेतन शाळेत वृक्षदिंडी, वृक्षारोपण व वनभोजन हा कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला. या कार्यक्रमाला उद्योजक सोमनाथ कौटकर, आत्माराम कौटकर, बाळासाहेब वाडेकर, प्रियंका राऊत, विजय भोसले आदि उपस्थित होते. त्यांनी ‘वृक्ष – निसर्गाची मौल्यवान भेट’ या विषयाचे महत्त्व सांगून या उपक्रमाला सुरुवात केली. त्यानंतर संपूर्ण चाकण, राक्षेवाडी गावातून वृक्षदिंडी काढली. गावकऱ्यांना यावेळी संस्थेेचे अध्यक्ष शामराव देशमुख, रोहिणी देशमुख व दिपक शिंदे यांनी पर्यावरणाचे महत्त्व पटवून दिले. शाळेच्या आवारात व गावातील परिसरात वृक्षारोपण करण्यात आले. विद्यार्थ्यांना देण्यात आलेली तुळशीची व इतर विविध प्रकारची रोपेही शालेय परिसरात लावण्यात आली.