चाकण येथे बुधवारी मोफत हृदयरोग तपासणी शिबीर,.
सत्यविचार न्युज :
चाकण हार्ट फौंडेशन व ध्रुवशेठ कानपिळे मित्र परिवार यांच्या संयुक्त विद्यमाने व डॉ.अमोल बेनके यांच्या विशेष सहकार्याने चाकण येथे बुधवारी ( दि. २८ ) मोफत हृदयरोग तपासणी शिबीर आयोजित करण्यात आल्याची माहिती चाकण हार्ट फौंडेशनचे अध्यक्ष सुनील शहा व चाकण रोटरी क्लबचे सचिव डॉ. अमोल बेनके यांनी दिली.
चाकण येथील युनीकेअर हॉस्पिटल मध्ये वरील नियोजित दिवशी सकाळी नऊ ते दुपारी साडेतीन यावेळेत या शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. डॉ. अमोल बेनके, डॉ. कौस्तुभ तिडके, डॉ. पल्लवी बेनके, डॉ. सत्यजित सूर्यवंशी, डॉ. रावसाहेब आवटी, डॉ. भरत राउत, डॉ. विकास साबळे, डॉ.सोनाली साबळे व डॉ.स्मिता राऊत आदि तज्ञ डॉक्टर्स शिबिरार्थींची मोफत हृदयरोग तपासणी करून मार्गदर्शन करणार आहेत. जास्तीत जास्त गरजूंनी या शिबिराचा लाभ घेण्याचे आवाहन डॉ. पल्लवी बेनके, चाकण रोटरी क्लबचे अध्यक्ष अतुल वाव्हळ, उद्योजक भरत कानपिळे व कीर्तीकुमार शहा आदींनी केले आहे.