साहेबरावजी बुट्टेपाटील महाविद्यालयाच्या स्वयंसेवकांनी जिंकली तिन्हेवाडी ग्रामस्थांची मने.!
राष्ट्रीय सेवा योजनेच्या विशेष हिवाळी श्रमसंस्कार शिबिर उत्साहात संपन्न.
सत्यविचार न्युज:
राजगुरुनगर: साहेबरावजी बुट्टेपाटील महाविद्यालयाचे विशेष हिवाळी श्रमसंस्कार शिबीर तिन्हेवाडी (ता:खेड) येथे दि. १८ ते २४ जानेवारी दरम्यान उत्साहात संपन्न झाले. युवकांचा ध्यास ग्राम-शहर विकास अंतर्गत लोकसंख्या नियंत्रण जनजागृती
अशी संकल्पना असलेल्या शिबिरात सुमारे ५० स्वयंसेवकांनी सहभाग घेतला.
यावेळी खेड तालुका शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष ॲड. देवेंद्र बुट्टेपाटील, उपाध्यक्ष नानासाहेब टाकळकर
संचालक हिरामण सातकर, महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेस महिला आघाडीच्या उपाध्यक्ष ॲड.राजमाला बुट्टेपाटील,बाळासाहेब सांडभोर, सुरेश टाकळकर,साहेबरावजी बुट्टेपाटील महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.एच.एम.जरे,हुतात्मा राजगुरू महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. शिरीष पिंगळे, उपप्राचार्य डॉ. संजय शिंदे,प्रबंधक कैलास पाचारणे,लोकनियुक्त सरपंच प्रतीक्षा पाचारणे, वित्त व लेखा अधिकारी खरेदी विक्री संघ भास्कर जगदाळे,
राजगुरूनगर सहकारी बँकेच्या संचालिका अश्विनी पाचारणे, लतिका भालेराव,उपसरपंच बाळासाहेब सांडभोर, रंगनाथ आरुडे, माजी सरपंच कविता पाचारणे, उदय बाप्पू पाचारणे, उद्योजक संतोष पाचारणे, पोलीस पाटील महेश सांडभोर, किरण कोहिनकर अँड सुषमा आरुडे,प्राध्यापक बी. बी. आरुडे,रामदास पाचारणे, ग्रामपंचायत सदस्य
विठ्ठल वरकड, भगवान पाचारणे, ज्ञानेश्वर आरूडे, प्रियांका पाचारणे, प्रियांका ढोरे, ज्योती सांडभोर, कविता आरुडे, सीमा पठारे, कविता सांडभोर, चेअरमन मधुकर सांडभोर, माजी चेअरमन शिवाजी आरूडे, संचालक पंकज पाचारणे, दिगंबर सांडभोर,अक्षय आरुडे, संदेश पाचारणे, महिला बचत गटाच्या अध्यक्ष मनीषा आरूडे, त्रिमूर्ती विद्यालयाचे अध्यक्ष पांडुरंग आरूडे, उपाध्यक्ष मोहनभाऊ पाचारणे,
विकास आरुडे, त्रिमूर्ती विद्यालयाचे मुख्याध्यापक राजाराम दिघे,जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या मुख्याध्यापिका मनिषा कांबळे, मुख्याध्यापक चंद्रकांत डफळ,ग्रामसेवक बाबाजी चव्हाण आदी उपस्थित होते.
शिबिर काळात स्वयंसेवकांनी गावातील सार्वजनिक ठिकाणांची स्वच्छता, लिंगभाव संवेदनशीलता जनजागृती, लोकशाहीतील सहभाग व जनजागृती, जलस्रोत व वृक्षरोपण, प्रधानमंत्री जनधन व विमा योजना, अन्न सुरक्षा जनजागृती, अपारंपारिक ऊर्जा स्रोत, वृक्ष लागवड, पर्यावरण संवर्धन, आरोग्य, महिला सबलीकरण, स्त्री-भ्रूणहत्या, ग्रामीण विकासात ग्रामसभेची भूमिका, आर्थिक स्वावलंबन,रस्ते सुरक्षा अभियान राबवत ग्रामस्थांचे प्रबोधन केले, टेंभीच्या डोंगरावरील दोन हजार वृक्षांची आळी करून वृक्षांना माती व खत टाकण्यात आले. महिला सबलीकरण अंतर्गत महिला बचत गटाचा मेळावा घेण्यात आला. या कार्यक्रमाला दोनशेहून अधिक महिला सहभागी झाल्या होत्या.
अशा प्रकारे विविध उपक्रम शिबीर कालावधीत राबवत साहेबरावजी बुट्टेपाटील महाविद्यालयाच्या स्वयंसेवकांनी तिन्हेवाडी ग्रामस्थांची मने जिंकली.
शिबिरातील स्वयंसेवकांना जिल्हा सहकार शिक्षण अधिकारी विलास लिंबळे, अँड रामदास घोलप, सेवानिवृत्त प्राचार्य अंकुश केंगारे, उपविभागीय पोलिस अधिकारी सुदर्शन पाटील, अध्यक्ष जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोग वाशिम प्रा. डॉ. प्रकाश चौधरी, शिवव्याख्याते संपत गारगोटे, रासेयो जिल्हा समन्वयक प्रा. डॉ. श्रीकांत फुलसुंदर, तालुका कृषी अधिकारी नंदू वाणी, निवासी नायब तहसीलदार मदन जोगदंड, दुग्ध व्यवसायिक नामदेव सांडभोर यांनी मार्गदर्शन केले.
या शिबिरातील उत्कृष्ट स्वयंसेवक म्हणून अभिषेक कोहिनकर, आणि सुवर्णा पढर यांना गौरविण्यात आले.
शिबिराचे आयोजन रासेयो कार्यक्रम अधिकारी प्राध्यापक जी. जी. आहेरकर, यांच्यासह जेष्ठ प्राध्यापक साईनाथ पाचारणे,प्राध्यापक डॉ. शिल्पा जगताप, प्रा.अभिजित बेंडाले, प्रा.डॉ.तुषार वेहळे, सह कार्यक्रम अधिकारी प्राजक्ता गदादे,मोनिका कोल्हे,आरती इंदायीस,सोनाक्षी बेल्हेकर, शशिकांत बुरुड, श्वेताली देशमुख, शिवम कदम, लहू रौंधळ, अफसाना शेख, ललिता काठे, अल्फिया इनामदार , दिलीप गुप्ता, दर्शना भगत,शिल्पा खराडे, कोमल मांडगे, पूर्वा टिळेकर, सोनाली नाईकरे यांनी केले.