खराबवाडी ग्रामपंचायत निवडणूक प्रभाग रचना कार्यक्रम जाहीर
सत्यविचार न्युज :
खेड तालुक्यातील खराबवाडी ग्रामपंचायतीच्या निवडणुकसाठी प्रभाग रचना कार्यक्रम जाहीर झाला आहे. त्यामुळे लवकर या गावामध्ये निवडणुकेचा धुराळा उडणार आहे. सरपंचपद जनतेतून असल्याने निवडणुका लक्षवेधी होणार आहेत.
खराबवाडी ग्रामपंचायतची निवडणूक वॉर्ड रचना जाहीर…!
खराबवाडी ग्रामपंचायत निवडणूकीची वॉर्ड रचना आज(दि.८) रोजी जाहीर करण्यात आले आहे.
खराबवाडी ग्रामपंचायतच्या निवडणूकीची वॉर्ड रचना चाकण मंडळाधिकारी चेतन चासकर, तलाठी शाम वाल्हेकर व खराबवाडी ग्रामपंचायत ग्रामविकासधिकारी रमेश चौरे यांच्या उपस्थित काढण्यात आली. यावेळी गावातील ग्रामस्थ उपस्थित होते.
खराबवाडी गावाची वॉर्ड निहाय रचना पुढील प्रमाणे…
खराबवाडी गावात एकूण ६ वॉर्ड असून त्यात एक नंबर वॉर्डमध्ये अनुसूचित जातीसाठी १, सर्वसामान्य प्रवर्गासाठी १, सर्वसामान्य स्त्री साठी १ जागा निघाली आहे.
वॉर्ड नंबर दोनमध्ये अनुसूचित जमाती १, अनुसूचित जाती स्त्री १, सर्वसाधारण १ जागा निघाली आहे.
वॉर्ड नंबर तीनमध्ये अनुसूचित जाती स्त्री १ व सर्वसाधारण १ अशी जागा निघाली आहे.
वॉर्ड नंबर चारमध्ये सर्वसाधारण १, सर्वसाधारण स्त्री २ जागा निघाल्या आहेत.
वॉर्ड नंबर पाचमध्ये सर्वसाधारण १, सर्वसाधारण स्त्री २ जागा निघाली आहे.
वॉर्ड नंबर सहामध्ये सर्वसाधारण १, सर्वसाधारण स्त्रीसाठी २ जागा निघाल्या आहेत.
खराबवाडी ग्रामपंचायतची निवडणूक बऱ्याच प्रतीक्षेनंतर होत असल्याने गावातील नागरिकांची उत्सुकता शिगेला पोहचली आहे.