पिंपळे गुरव ते श्री क्षेत्र नारायणपूर बस सेवा सुरू
पिंपरी, (सत्यविचार न्यूज) –पिंपरी चिंचवड येथील सांगवी ते रहाटणी परिसरातील भाविक भक्त व नागरिक खूप मोठ्या प्रमाणात दर गुरुवारी व दर पौर्णिमेला श्री क्षेत्र नारायणपूर येथे ये जा करतात, आपल्या परिसरातील नगरिकांसाठी पिंपळे गुरव ते क्षेत्र नारायणपूर बस सेवा चालू करावी, अशी मागणी काही भाविक भक्तांनी भाजप शहराध्यक्ष शंकरशेठ जगताप यांच्याकडे लेखी निवेदनाद्वारे केली होती.शंकर जगताप यांनी पी एम पी एल ची बस सेवा सांगवी ते नारायणपूर चालू केली आहे.
भाविक भक्त व नागरिकांच्या मागणीनुसार गुरुवार पासून सुरू करण्यात आली. या बस सेवेमुळे नागरिकांना नारायणपूर येथील श्री एकमुखी दत्त महाराजांच्या मंदिरात ये-जा करता येणार असल्याने नागरिकांमध्ये आनंदाचे वातावरण पसरले आहे.