खेड तालुका मराठी पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी ‘सकाळ’चे बातमीदार गणेश फलके; तर उपाध्यक्षपदी ‘लोकमत’चे राजेंद्र मांजरे व सचिवपदी शरद भोसले यांची निवड झाली.
खेड तालुका पत्रकार संस्था संचलित खेड तालुका पत्रकार संघाची सभा राजगुरुनगर येथील शासकीय विश्रामगृहात पार पडली. या वेळी एकमताने पदाधिकाऱ्यांच्या निवडी केल्या. तालुक्यातील पत्रकारांसाठी कार्यशाळा, आरोग्य शिबिरे व अन्य उपक्रम राबवणार आहे, असे अध्यक्ष फलके व उपाध्यक्ष मांजरे यांनी सांगितले. तालुक्यातील सर्वपत्रकारांना सामावून घेऊन पत्रकार संघ विधायक उपक्रम राबविणार आहे. ग्रामीण पत्रकारांसमोरील नवीन आव्हाने आणि समस्या सोडवण्यासाठी एकजुटीने वाटचाल करणार आहे, असे अभिनंदनपर भाषणात राजेंद्र सांडभोर यांनी सांगितले.
नूतन कार्यकारिणी पुढीलप्रमाणे : अध्यक्ष- गणेश फलके, उपाध्यक्ष- राजेंद्र मांजरे, कार्याध्यक्ष- चंद्रकांत मांडेकर, सचिव- शरद भोसले, खजिनदार- विजय मुन्हे, कार्याध्यक्ष खजिनदार- तुषार मोढवे, सहकार्याध्यक्ष अशोक टिळेकर, सहसचिव रत्नेश शेवकरी, सोशल मीडिया प्रमुख – प्रफुल्ल टंकसाळे, पत्रकार परिषद प्रमुख :- तुकाराम बोंबले, प्रसिद्धीप्रमुख आदेश टोपे, कायदेशीर सल्लागार :- अॅड. नीलेश कड पाटील, सल्लागार:-एकनाथ सांडभोर, राजेंद्र सांडभोर, कोंडीभाऊ पाचारणे, अविनाश दुधवडे, रूपेश बुट्टे पाटील, नंदकुमार मांदळे, कुंडलिक वाळुंज,
कार्यकारणी सदस्य :- गणेश आहेरकर, सिध्देश कर्णावट, सतीश आगळे, संतोष फडके