राजगुरूनगर (पुणे) : खेड तालुक्यातील एमआयडीसी क्षेत्रातील शिंदे ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी सायली तुषार टेमगिरे यांची बिनविरोध निवड झाली. संतोष पानमंद यांनी सरपंचपदाचा राजीनामा दिल्याने ग्रामपंचायत सभागृहात बुधवार दि. १७ जानेवारी रोजी संपन्न झाली. सरपंचपदासाठी सायली टेमगिरे यांचा एकमेव अर्ज आल्याने त्यांची निवड बिनविरोध झाल्याची घोषणा निवडणूक अधिकारी तथा करंजविहिरे मंडलाधिकारी राजेंद्र वाढणे यांनी केली. निवडणुकीसाठी सभागृहात नवनिर्वाचित सरपंच सायली टेमगिरे, ग्रामपंचायत सदस्य सोनाली भीमसेन टेमगिरे, संगीता विजय केंदळे, सिताराम गायकवाड, प्रकाश मेंगळे, सुगंधा मेंगळे, हे सदस्य उपस्थित होते. मावळते सरपंच संतोष पानमंद, सचिन देवकर, व विद्यमान उपसरपंच सोनाली पानमंद हे निवडणुकीवेळी गैरहजर राहिले.निवडीनंतर गावातून मिरवणूक काढण्यात आली होती.