महाळुंगे : भव्य मोफत आरोग्य तपासणी, नेत्र चिकीत्सा आणि रक्त तपासणी शिबीर, महिलांसाठी आरोग्य विषयक मार्गदर्शन
आर पी जी फौंडेशन आणि ग्रामपंचायत महाळुंगे यांच्या संयुक्त विध्यमाने महाळुंगे मध्ये महाआरोग्य शिबिराचे आयोजन.
सरपंच अर्चना म्हाळुंगकर आणि माजी सरपंच मयुरी म्हाळुंगकर यांची शिबिरात उपस्थिती.
श्री समर्थ सद्गुरू श्रीपती बाबा महाराज मंदीर सभामंडप येथे आर पी जी फौंडेशन आणि ग्रामपंचायत महाळुंगे यांच्या सयुंक्त विध्यमाने शुक्रवार दिनांक १९ जानेवारी २०२४ रोजी महा आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. मोफत डोळे तपासणी व मोफत चष्मा वाटप शिबीर, आरोग्य शिबिर आणि रक्त तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.
सदर शिबिराला आस्था फाउंडेशन, मेडिहोम लॅब यांचे सहकार्य लाभले.
सदर आरोग्य शिबिरात विविध आरोग्य विषयी सेवा मोफत उपलब्ध करून देण्यात आल्या होत्या. यामध्ये सर्वसाधारण आरोग्य तपासणी व रक्त चाचण्या तसेच नेत्र चिकित्सा, रक्त दाब तपासणी, रक्त गट तपासणी , आर.बी.सी. , सी.बी.सी. , बी. एम. डी. , बी.एम.आय. आणि ई.सी.जी. तपासण्या इत्यादीचा समावेश होता. त्याचप्रमाणे गरजू व ज्येष्ठ नागरीकांना डोळे तपासून मोफत चष्मे वाटप करण्यात आले.
आर पी जी फाउंडेशन आणि रायकेम आर पी जी फौंडेशन या संस्था गेली अनेक वर्षे सामाजिक क्षेत्रात अग्रेसर असून संस्थेच्या स्थापनेपासून सामाजिक,आरोग्य,आणि शैक्षणिक क्षेत्रात विविध वंचित समुहांच्या सक्षमिकरणासाठी कार्यक्रम राबवित आहे .
तसेच आरोग्य शिबिरात दोनशेहून अधिक लोकांनी उपस्थिती लावली आणि जवळपास दीडशे लोकांची रक्त तपासणी केली.
शिबिरात दीडशे लोकांना मोफत चष्मे वाटप करण्यात आले तसेच गरजू लोकांना मोफत औषधे देण्यात आले. पन्नासहुन अधिक लोकांची बी पी, हिमोग्लोबिन तपासणी करण्यात आली.
गरजू आणि वंचीतांसाठी विविध सामाजिक उपक्रम राबविण्याची परंपरा दोन्हीही संस्थानी कायम राखली याबद्दल सरपंच अर्चना म्हाळुंगर यांनी कौतुक केले. प्रथम उपस्थित असलेल्या ज्येष्ठ नागरिक यांच्या हस्ते शिबिराचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी फाउंडेशन चे संचालक दोन्ही संस्थेचे सभासद, आस्था फाउंडेशन च्या दीपा शिंदे, मेडिहोम लॅब चे आकाश निढाळकर उपस्थित होते