आळंदीत ज्ञानेश्वर महाराज यांचा ७२८ वा संजीवन समाधी दिन सोहळा
५ ते १२ डिसेंबर कालावधीत धार्मिक सोहाळा
आळंदी : आळंदी कार्तिकी यात्रा २०२३ अंतर्गत श्री संत ज्ञानेश्वर महाराज यांचा ७२८ वा संजीवन समाधी दिन सोहळा ५ ते १२ डिसेंबर या कालावधीत विविध धार्मिक उपक्रमांसह प्रथा परंपरांचे पालन करीत साजरा होणार आहे. ९ डिसेंबरला कार्तिकी एकादशी आणि ११ डिसेंबरला श्रींचा मुख्य ७२८ वा संजीवन समाधी दिन सोहळा लाखो वारकरी भाविकांच्या नामजयघोषात होणार असल्याची माहिती श्री संत ज्ञानेश्वर महाराज संस्थान कमेटीचे व्यवस्थापक ज्ञानेश्वर वीर यांनी दिली.
या सोहळ्याचे नियोजन श्री संत ज्ञानेश्वर महाराज संस्थान कमेटीचे प्रमुख विश्वस्त योगेश देसाई, विश्वस्त विकास धागे पाटील, लक्ष्मीकांत देशमुख, भावार्थ देखणे, राजेंद्र उमाप, योगी निरंजननाथ यांचे मार्गदर्शनात जाहीर करण्यात आले आहे. पार्थ परंपरांचे पालन करीत माऊली मंदिरात होणाऱ्या परंपरेच्या कार्यक्रम आळंदी देवस्थान तर्फे जाहीर करण्यात आले असून सोहळ्याची तयारी आळंदी मंदिरात सुरु करण्यात आली आहे.
सोहळ्यात मंगळवार ( दि. ५ ) सकाळी ७ ते ९ या वेळेत हैबतबाबा यांचे वंशज, प्रतिनिधी ह.भ.प. बाळासाहेब महाराज आरफळकर पवार यांच्या तर्फे हैबतबाबांच्या पायरीचे पूजन हरिनाम गजरात होऊन सोहळ्यास प्रारंभ होणार आहे. शनिवार ( दि. ९ ) आळंदीत कार्तिकी एकादशी साजरी होणार आहे. रात्री साडेबारा ते पहाटे २ या वेळेत ११ ब्रम्हवृंदांच्या वेदमंत्र जय घोषात माऊलींच्या समाधीवर पवमान अभिषेक व दुधारती होईल. यावेळी दर्शनरांगेत उभे असलेल्या पहिल्या दाम्पत्याला या महापूजेचा मान दिला जातो. दुपारी १ वाजता श्रींची पालखी नगरप्रदक्षिणा होईल. रविवार ( दि. १० ) पहाटे साडे तीन ते चार या वेळेत खेडचे प्रांत अधिकारी जोगेंद्र कट्यारे यांच्या हस्ते पंचोपचार पूजा होईल. त्यानंतर दुपारी ४ ते सायंकाळी ७ यावेळेत रथोत्सव मिरवणूक होईल. मंदिराच्या गाभाऱ्यात रात्री ११ ते १२ या वेळात खिरापत पूजा, फडकरी, मानकरी, दिंडी प्रमुख, सेवेकरी यांना नारळ प्रसाद वाटप होणार आहे. सोमवार ( दि. ११ ) माऊलींचा ७२८ वा संजीवन समाधी दिन सोहळा हरिनाम गजरात होणार आहे. यात सकाळी ९ ते दुपारी १२ यावेळेत परंपरे नामदास महाराज यांचे संजीवन समाधी सोहळ्याचे प्रसंगावर आधारित कीर्तन सेवा होईल. दुपारी १२ ते साडेबारा या वेळेत संजीवन समाधी सोहळ्या निमित्त घंटानाद, पुष्पवृष्टी, आरती आणि मान्यवरांना नारळ प्रसाद वाटप होणार आहेत. मंगळवार ( दि. १२ ) रात्री साडेनऊ ते साडेबारा या वेळेत श्रींचा छबीना मिरवणूक होणार आहे.
या सोहळ्यात ५ ते १२ डिसेंबर या कालावधित माऊली मंदिरात दररोज पवमान अभिषेक, दुधारती, भाविकांच्या महापूजा, महानैवेद्य, कीर्तन, धुपारती, जागर असे धार्मिक कार्यक्रम प्रथा परंपरांचे पालन करीत होणार आहेत.
कार्तिक वद्य अष्टमी ते चतुर्दशी / अमावस्या मंदिरातील धार्मिक कार्यक्रमात कार्तिक वद्य अष्टमी, मंगळवार (दि ५ ) पहाटे ३ ते ५ पवमान अभिषेक व दुधारती, सकाळी ५ ते ११ : ३० श्रींच्या चलपादुकांवर भाविकांच्या महापूजा, सकाळी ७ ते ९ बाळासाहेब पवार हैबतरावबाबा वंशज / प्रतिनिधी यांच्या तर्फे वै.ह भ प हैबतबाबा पायरी पूजा. दुपारी १२ :३० ते १ महानैवेद्य, सायंकाळी ६ ते ८ वाजता वीणा मंडपात ह भ प योगीराज ठाकूर यांच्या तर्फे कीर्तन सेवा. रात्री ८ ते ८ :३० धुपारती, रात्री ९ ते ११ वीणा मंडपात ह भ प बाबासाहेब आजरेकर यांचे तर्फे कीर्तन सेवा. रात्री १० ते १२ हैबतबाबा पायरीच्या पुढे ह.भ.प. वासकर महाराज, १२ ते २ मारुतीबुवा कराडकर, रात्री २ ते ४ ह. भ. प. हैबतबाबा आरफळकर यांचेतर्फे जागर सेवा होणार आहे.
कार्तिक वद्य नवमी, बुधवार ( दि. ६ ) पहाटे ३ ते ५ पवमान, अभिषेक व दुधारती, पहाटे ५ ते सकाळी ११ : ३० वाजेपर्यंत श्रींच्या चलपदुकांवर भाविकांच्या महापूजा, दुपारी १२ :३० ते १ महानैवेद्य, सायंकाळी ६ : ३० ते ८ :३ ० वीणा मंडपात ह भ प बाबासाहेब देहूकर यांच्या तर्फे कीर्तन सेवा. रात्री ८ : ३० ते ९ धुपारती,रात्री ९ : ३० ते ११ वा. वीणा मंडपात हभप वासकर महाराज यांच्या तर्फे कीर्तन सेवा होत आहे.
कार्तिक वद्य दशमी, गुरुवार ( दि. ७ ) पहाटे ३ ते ५ पवमान अभिषेक व दुधारती, सकाळी ५ ते ११ : ३० श्रींच्या चलपादुकांवर भाविकांच्या महापूजा, दुपारी १२ :३० ते १ महानैवेद्य, सायं. ४ : ३० ते ६ :३० वा.गंगुकाका शिरवळकर यांच्या तर्फे कीर्तन सेवा, सायंकाळी ६ :३० ते ८ :३० वा. वीणा मंडपामध्ये धोंडोपंत दादा अत्रे यांच्या तर्फे कीर्तन सेवा, रात्री ९ ते ११ श्रींची पालखी मंदिर प्रदक्षिणा, रात्री ९ ते ११ वासकर महाराज कीर्तन सेवा (वीणा मंडप), रात्री ११ ते ११ : ३० धुपारती, रात्री ११ : ३० ते १२ : ३० वाल्हेकर महाराज यांचे तर्फे जागर सेवा होईल.
कार्तिक वद्य दशमी ( शुक्रवार स्मार्त एकादशी ) दि. ८ रोजी पहाटे ३ ते ५ पवमान अभिषेक व दुधारती, सकाळी ५ ते ११ : ३० श्रींच्या चलपादुकांवर भाविकांच्या महापूजा, दुपारी १२ :३० ते १ महानैवेद्य, सायंकाळी ४ : ३० ते ६ : ३० वीणा मंडपामध्ये ह भ प गंगुकाका शिरवळकर यांच्या तर्फे कीर्तन सेवा. ६ :३० ते ८ :३० वा. धोंडोपंत दादा अत्रे यांच्या तर्फे कीर्तन सेवा. रात्री ८ :३० ते ९ धुपारती, रात्री ९ ते ११ वीणा मंडपात हभप वासकर महाराज यांच्या तर्फे कीर्तन सेवा संपन्न होणार आहे. रात्री ११ :३० ते १२ :३० वीणा मंडपात वाल्हेकर महाराज यांचेतर्फे जागर सेवा रुजू होईल.
कार्तिक वद्य द्वादशी, भागवत एकादशी (कार्तिकी एकादशी यात्रा) शनिवार ( दि. ९ ) रोजी रात्री १२ :३० ते पहाटे २ या वेळेत ११ ब्रम्हवृंदांच्या वेद घोषात पवमान अभिषेक व दुधारती, दुपारी १२ ते १२ : ३० महानैवेद्य, दुपारी १ वाजता श्रींची नगर प्रदक्षिणा, रात्री ८ : ३० धुपारती, रात्री १२ ते २ श्री मोझे यांचेतर्फे जागर सेवा होणार आहे.
कार्तिक वद्य द्वादशी, रविवार ( दि. १० ) पहाटे २ ते ३ : ३० पवमान अभिषेक व दुधारती, पहाटे ३ :३० ते ४ प्रांतअधिकारी खेड यांचे हस्ते पंचोपचार पूजा. पहाटे ३ ते ६ मुक्ताई मंडपात नांदेडकर मंडळींची दिंडी क्र.१५ यांचे तर्फे काकडा भजन सेवा. सकाळी ५ ते ११ : ३० श्रींच्या चलपादुकांवर भाविकांच्या महापूजा, दुपारी १२ :३० ते १ महानैवेद्य, दुपारी ४ ते ७ रथोत्सव संपन्न होणार आहे. दुपारी ४ ते ६ वीणा मंडपात ह भ प हरिभाऊ बडवे यांच्या तर्फे कीर्तन सेवा. रात्री ९ ते ११ वीणा मंडपात ह भ प केंदूरकर महाराज यांच्या तर्फे कीर्तन सेवा. रात्री ११ ते १२ पास धारक, खिरापत पूजा, प्रसाद वाटप- वीणा मंडप, श्रींच्या गाभाऱ्यात फडकरी, मानकरी, दिंडी प्रमुख, सेवेकरी यांना नारळ प्रसाद वाटप राहील.
कार्तिक वद्य १३ /१४ त्रयोदशी सोमवार ( दि. ११ ) पहाटे ३ ते ४ पवमान अभिषेक व दुधारती, सकाळी ५ ते ९ : ३० श्रींच्या चलपादुकांवर भाविकांच्या महापूजा, सकाळी ७ ते ९ हैबतबाबा पायरी पुढे ह भ प हैबतबाबा आरफळकर यांचे तर्फे कीर्तन सेवा, सकाळी ७ ते ९ विणा मंडपामध्ये कीर्तन, सकाळी ७ ते ९ भोजलींग काका मंडप येथे निकम दिंडी यांचे कीर्तन, सकाळी ९ ते १२ ह भ प नामदास महाराज यांचे संजीवन समाधी सोहळ्याचे कीर्तन, दुपारी १२ ते १२ : ३० श्रींचा ७२८ वा संजीवन समाधी दिना निमित्ताने घंटा नाद ,पुष्पवृष्टी व आरती मान्यवरांना नारळ प्रसाद, दुपारी १२ :३० ते १ महानैवेद्य, सायंकाळी ६ : ३० ते ८ : ३० विणा मंडपात ह भ प सोपान काका देहूकर यांच्या तर्फे कीर्तन सेवा, रात्री ८ : ३० ते ९ धुपारती, रात्री ९ : ३० ते ११ : ३० कारंजा मंडपा मध्ये हरिभाऊ बागडे व पंढरी केसरकर यांचेतर्फे भजन, रात्री १२ ते ४ हैबतरावबाबा आरफळकर यांचेतर्फे जागर सेवा होत आहे. कार्तिक आमावस्या मंगळवार ( दि.१२ ) पहाटे ३ ते ५ पवमानपूजा, दुधारती. सकाळी ५ ते ११ श्रींच्या चलपादुकांवर भाविकांच्या महापूजा, दुपारी १२ : ३० ते १ महानैवेद्य, दुपारी ४ ते ६ श्री मोझे यांच्या तर्फे कीर्तन सेवा. रात्री ८ ते ८ :३० धुपारती, रात्री ९ : ३० ते १२ : ३० श्रींचा छबिना, रात्री १२ :३० शेजारती ने सोहळ्याचे सांगता हरिनाम गजरात होईल.