श्री ज्ञानेश्वर महाराज संस्थान कमेटी विश्वस्तांचा ज्ञानेश्वर महाराज थोरल्या पादुका ट्रस्ट तर्फे सत्कार
आळंदी : वडमुखवाडी येथील श्री संत ज्ञानेश्वर महाराज थोरल्या पादुका देवस्थान ट्रस्टचे वतीने श्री ज्ञानेश्वर महाराज संस्थान कमेटी आळंदी या संस्थेवर नव्याने नियुक्त झालेले विश्वस्त ॲड राजेंद्र उमाप, योगी निरंजननाथ यांचा सत्कार ट्रस्टचे अध्यक्ष ॲड विष्णू तापकीर यांचे हस्ते शाल,श्रीफळ देवून सत्कार करण्यात आला.
या प्रसंगी श्री ज्ञानेश्वर महाराज संस्थान कमेटीचे विश्वस्त ॲड विकास ढगे पाटील, माऊलींचे पालखी सोहळा प्रमुख बाळासाहेब आरफळकर, संस्थानचे व्यवस्थापक माऊली वीर, वकिलांची ग्राहक सहकारी सोसायटी लिमिटेडचे चेअरमन ॲड सत्यजित तुपे, उपाध्यक्ष ॲड रेखा करंडे, सेक्रेटरी ॲड आतिष लांडगे, पिंपरी चिंचवड बारा सोसिएशनचे अध्यक्ष रामराजे भोसले, सेक्रेटरी ॲड धनंजय कोकणे, हिशोब तपासणीस ॲड संदीप तापकीर आदी मान्यवरांचा यावेळी ट्रस्टचे अध्यक्ष ॲड विष्णू तापकीर यांचे हस्ते सत्कार शाल,श्रीफळ देवून करण्यात आला. यावेळी हिरामण बुर्डे महाराज, मनोहर भोसले, रोहिदास परांडे, ह भ. प. रमेश घोंगडे, साहेबराव काशीद आदी मान्यवर उपस्थित होते.