आळंदी परिसरात संविधान दिनी विविध उपक्रम
संविधान आहे भारताची शान !
जगाने गायिले त्याचे गुणगान !!
ज्या विभूतींनी रचिले संविधान !
त्या सर्वांना आपले त्रिवार नमन !!
आळंदी : भारताचे संविधान व त्याचे रचयिता डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या सन्मानार्थ ध्यास फौंडेशन संचलित महर्षी वाल्मिकी बालकमंदिर, महर्षी वाल्मिकी विद्यावर्धिनी, डॉ. माधवराव सानप विदयालय, कनिष्ठ महाविद्यालयात रविवारी ( दि. २६ ) आळंदी परिसरासह विविध शाळांत विविध उपक्रमांनी ध्यास प्रशालेत देखील संविधान दिन उत्साहात साजरा करण्यात आला.
यावेळी प्रशालेच्या मुख्याध्यापिका अक्षता कुलकर्णी यांचेसह सर्व उपस्थित शिक्षक, विद्यार्थी यांचे स्वागत करून डॉ. बाबासाहेब आंबेडकर व संविधान प्रास्ताविक प्रतिमेचे पूजन करण्यात आले. इयत्ता पहिली ते सहावी मधील सर्व विद्यार्थ्यांनी सामूहिक संविधान प्रास्ताविक वाचन केले. उपशिक्षिका स्मिता रंधवे यांनी संविधान दिनाची माहिती सांगितली. संविधान दिन निमित्त पहिली ते सहावी मधील विद्यार्थ्यांसाठी हस्ताक्षर स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. स्पर्धा घेऊन सर्वांचे आभार मानण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन उपशिक्षिका स्मिता रंधवे यांनी केले. कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.
श्री ज्ञानेश्वर विद्यालयात संविधान दिन उत्साहात साजरा
जगातील सर्वात मोठी लिखित लोकशाही राज्यघटना ही भारत देशात असून या संविधानात नागरिकांचे मूलभूत हक्क व अधिकाराचा अंतर्भाव आहे. तसेच संविधानाच्या प्रास्ताविकेत स्वातंत्र्य, समता, बंधुता, न्याय, राष्ट्रीय एकता व एकात्मता, धर्मनिरपेक्षता, समाजवाद, लोकशाही, गणराज्य प्रस्थायी करण्यासंदर्भात अशा अनेक गोष्टी विषयी सांगितले आहे.
श्री ज्ञानेश्वर शिक्षण संस्था संचलित श्री ज्ञानेश्वर प्राथमिक यानिमित्ताने विद्यामंदिर व श्री ज्ञानेश्वर विद्यालय व ज्युनिअर कॉलेज आळंदी येथे पवित्र संविधान दिनाचे आयोजन करण्यात आले. या निमित्ताने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे व संविधानाच्या पवित्र ग्रंथाचे पूजन करण्यात आले.
यावेळी संस्थेचे विश्वस्त प्रकाश काळे, विद्यालयाचे पर्यवेक्षक किसन राठोड, प्राथमिक विभागाचे मुख्याध्यापक प्रदीप काळे, हेमांगी उपरे, प्रकाश भागवत, श्रीधर घुंडरे, प्राजक्ता हरपळे, सूर्यकांत खुडे, स्वप्निल रंधवे, छाया कुऱ्हाडे, विजया घुंडरे, वासंती रोकडे, रवींद्र शेखरे, जगदीश गायकवाड, होवाळ सर, भाऊसाहेब पाटील, सोपान काळे आदी उपस्थित होते.
यावेळी प्रकाश काळे, श्रीधर घुंडरे, सूर्यकांत खुडे यांनी संविधानाची गरज, महत्व सांगत सर्वांनी संविधानाचे वाचन करून आचरणात आणण्यास प्रेरित केले. यावेळी संविधानाचे सामूहिक वाचन करण्यात आले.
आळंदी नगरपरिषद कार्यालयात नगरपरिषदेचे मूख्याधिकरी कैलास केंद्रे यांचे हस्ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे प्रतिमेचे पूजन करीत डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची प्रतिमा नागरपरिषदेस भेट देण्यात आली. रिपब्लिकन सेनेच्या माध्यमातून संविधान दिवस साजरा करण्यात आला. यावेळी संविधान प्रास्ताविका वाचन करण्यात आले. तसेच रिपब्लिकन सेनेच्या माध्यमातून भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची शासकीय प्रतीमा नगरपरिषदेला भेट देण्यात आली. या प्रसंगी पुणे जिल्हा अध्यक्ष संदीप रंधवे, सुयोग कांबळे, अण्णा वाघमारे, भावेश चक्रे, राहूल डुमणे आदी पदाधिकारी उपस्थित होते. आळंदी जनहित फाउंडेशनचे वतीने कार्याध्यक्ष अर्जुन मेदनकर यांचे हस्ते संविधान दिनी संविधान प्रास्ताविकेचे वाटप करण्यात आले.