इंद्रायणी नदीचे प्रदूषण रोखण्यास उपाय योजना करा :- गोरे
महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण बोर्ड बैठकीत आवाहन
आळंदी : इंद्रायणी नदीतील वाढते प्रदूषण, तीर्थक्षेत्र आळंदी नदी पात्रातील पाण्यावर आलेला फेस फेस अशा गंभीर विषयावर चर्चा करुन कायम स्वरूपी इंद्रायणी नदीचे प्रदूषण रोखण्यास उपाय योजना करण्याची मागणी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे बैठकीत सदस्य नितीन गोरे यांनी केली.
महाराष्ट्र राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळाचे वतीने पुणे विभागीय कार्यालयात इंद्रायणी नदीचे प्रदूषण रोखण्यास उपाय योजना यासाठी आयोजित बैठकीत मंडळाचे सदस्य गोरे बोलत होते. यावेळी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण बोर्ड, पिंपरी चिंचवड महानगरपालिका, आळंदी नगरपरिषद, जलसंधारण विभाग, जिल्हा परिषद व अन्य विभागातील वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
या बैठकीस महाराष्ट्र राज्य प्रदूषण नियंत्रण बोर्डाचे पुणे कार्यालयाचे विभागीय अधिकारी रवी आंधळे, उपविभागीय अधिकारी मंचक जाधव, आळंदी नगरपरिषदेचे मुख्याधिकारी कैलास केंद्रे , पिंपरी चिंचवड महापालिकेचे योगेश आल्हाट, विलास देसले, सोहन निकम, खेड पंचायत समितीच्या श्रीमती धोंडे, माणिक शिंदे, चिन्मय नागपूरकर यादी उपस्थित होते. या बैठकीस महाराष्ट्र राज्य प्रदूषण नियंत्रण बोर्डाचे पुणे कार्यालयाचे विभागीय अधिकारी रवी आंधळे, उपविभागीय अधिकारी मंचक जाधव, आळंदी नगरपरिषदेचे मुख्याधिकारी कैलास केंद्रे , पिंपरी चिंचवड महापालिकेचे योगेश आल्हाट, विलास देसले, सोहन निकम, खेड पंचायत समितीच्या श्रीमती धोंडे, माणिक शिंदे, चिन्मय नागपूरकर यादी उपस्थित होते.
या बैठकीत नितीन गोरे यांनी सर्व विभागांच्या अधिकाऱ्यांशी विस्तृत चर्चा करून संवाद साधला. यावेळी इंद्रायणी नदीचे प्रदुषण कायम स्वरूपी रोखण्यासाठी ठोस उपाययोजना करण्यासाठी मार्गदर्शन करून संबंधित अधिकाऱ्यांना आवश्यक सूचना करण्यात आल्या. यावेळी संबंधित यंत्रणेतील अधिकाऱ्यांनी नदी प्रदूषण विषयावर करत असेलेले प्रकल्प, सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प, नदी सुशोभीकरण आराखडा याची माहिती दिली. पिंपरी चिंचवड महानगरपालिकेची यात महत्वाची भूमिका असून त्यांच्या हद्दीतील सर्व S.T.P व E.T.P लवकरात लवकर कार्यान्वित करावेत अशी मागणी नितीन गोरे यांनी केली. पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे निर्माण होणारे सांडपाणी STP मार्फत प्रक्रिया करुन औद्योगिक वसाहती मधील उद्योगांना पुनर्वापरास देण्यासाठी सूचना केल्या. आळंदी नगरपरिषदेचे मुख्याधिकारी कैलास केंद्रे यांनी आळंदीतील उपाय योजनेची विकास कामांची माहिती देत संवाद साधला.