खेड तालुका सकल मराठा समाज व मराठा सोयरीक संस्था यांच्या वतीने सोमवारी (दि. २७) सकाळी ११ ते २ या वेळेत राजगुरूनगर (ता. खेड) येथील कृषी उत्पन्न बाजार समिती सभागृहात मोफत मराठा वधुवर मेळावा होणार आहे, अशी माहिती पंचायत समिती माजी सभापती अंकुश राक्षे व जिल्हा परिषद माजी सदस्य बाबाजी काळे यांनी दिली.
याबाबत अधिक माहिती देताना मराठा क्रांती मोर्चा प्रदेश समन्वयक मनोहर वाडेकर म्हणाले की, सध्या मुलांना लग्नासाठी लवकर मुली मिळत नाही, लग्न जमत नाही. तसेच शेतकरी मुलांसोबत कोणीही लग्न करायला तयार होत नाही. आपले नातेवाईक मित्रपरिवार यांना देखील वेळ मिळत नसल्यामुळे कोणीही स्थळ दाखवण्यात आता मदत करत नाही. त्यामुळेच अशा वधूवर मेळाव्यांची गरज पडत आहे.
मराठा सोयरीक संस्थेचे अध्यक्ष अशोक कुटे यांनी सांगितले की या संस्थेकडून आतापर्यंत ७८ यशस्वी वधू वर मेळावे मोफत घेतले आहेत. आतापर्यंत ३००० लग्न पार पडलेले आहे. त्यापैकी ५५० लग्न हे विधवा, विधुर, घटस्फोटीत यांचे पार पडलेले आहेत. धर्मादाय कार्यालयात नाव नोंदणी केलेली शासनमान्य अशी ही संस्था आहे.
या मेळाव्यासाठी वधू- वरांनी स्वतः फोटो बायोडाटा घेऊन पालकांसह यायचे आहे. अनेक वेगवेगळ्या तालुक्यातील व वेगवेगळ्या जिल्ह्यातील सर्व प्रकारचे स्थळे या ठिकाणी बघायला मिळणार आहेत. अधिक माहितीसाठी ७४४७७८५९१० या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन बाजार समितीचे सभापती कैलास लिंभोरे, कविता बोंबले, ऍड. अनिल राक्षे, शंकर राक्षे, अॅड. निलेश आंधळे, दिलीप होले, निवृत्ती नाईकरे, शुभम बालघरे, सुदाम कराळे, सत्यवान शिंदे, अमितकुमार टाकळकर, सुरेखा डुबे आदी संयोजकांनी केले आहे.
![](https://satyavichar.in/wp-content/uploads/2023/11/IMG-20231125-WA0041.jpg)