खासदार डॉ. अमोल कोल्हे यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित रक्तदान शिबिरास प्रतिसाद
सत्यविचार न्यूज :
ज्ञानेश्वर भोसले यांचा पुढाकार, ग्रामस्थांचा उत्स्फुर्त सहभाग
शिरूर लोकसभा मतदारसंघाचे खासदार डॉ. अमोल कोल्हे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून महाविकास आघाडी व जगदंब प्रतिष्ठानने आयोजित करण्यात आलेल्या भव्य रक्तदान शिबिरास नागरिकांचा उदंड प्रतिसाद मिळाला.
या शिबिरासाठी राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार )तालुका अध्यक्ष हिरामण सातकर, पुणे जिल्हा रा यु काँ उपाध्यक्ष ज्ञानेश्वर भोसले, सोशल मीडिया अध्यक्ष हरिप्रसाद खळदकर, तेजस झोडगे,रोहिदास पवळे, पुणे जिल्हा काँग्रेस कमिटी सदस्य सुनील मिंडे, बाळकृष्ण मिंडे, जीवन मिंडे, पोलीस पाटील सचिन भोपे, सम्राट तुपे, विशाल पवार, ग्रामपंचायत सदस्य लक्ष्मण म्हाळुंगकर, गणपत भोसले, संजय गायकवाड, अनिकेत फलके, गणेश शिवळे, पुनीत पवार, आशुतोष मिंडे, विशाल जाधव, नवनाथ जाधव, समीर भोसले, देवेंद्र मिंडे बाळासाहेब पायगुडे, विलास मिंडे, हेमंत पायगुडे सागर भोसले, महिला कार्यकारिणी सदस्य सरिता वाघमारे, हेमलता भोपे आणि आजी माजी पदाधिकारी व ग्रामस्थ उपस्थित होते.
यावेळी हिरामण सातकर म्हणाले, राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने नेहमीच विधायक उपक्रम हाती घेतले जातात. रक्तदान शिबिराच्या माध्यमातून विक्रमी रक्त संकलन करण्यात आले आहे. याच्या माध्यमातून असंख्य रुग्णांना जीवनदान मिळणार आहे. यापुढेही असेच विधायक उपक्रम आयोजित करण्याचा मानस आहे.
रक्तदान शिबिराच्या निमित्ताने बोलताना ज्ञानेश्वर भोसले म्हणाले पावसाळ्याचे दिवस चालू आहे यामुळे डेंगू आणि चिकनगुनियाची साथ खूप मोठ्या प्रमाणात पसरली आहे. आज रक्ताचा आणि पांढऱ्या पेशींचा तुटवडा आहे. जास्तीत जास्त संख्येने होणारे रक्तदान हे अनेक रुग्णांना जीवनदान देणार आहे. आज या रक्तदान शिबिरात सहभागी प्रत्येकाबद्दल कृतज्ञता म्हणून सर्व रक्तदात्यांना प्रत्येकी पाच लाखाचे सुरक्षा कवच उपलब्ध करून देण्यात येत आहे. तसेच, प्रत्येक रक्तदात्यास आजीवन मोफत रक्त व त्यांच्या नातेवाईकास एक वर्ष रक्त मोफत उपलब्ध करून देण्यात येणार आहे. यापुढेही उपक्रमांना महाळुंगेकरांचा असाच प्रतिसाद मिळेल हा मला विश्वास आहे.