अलंकापुरीत एकादशी निमित्त इंद्रायणी नदी घाटाची स्वच्छता; इंद्रायणीची आरती
सत्यविचार न्यूज :
तीर्थक्षेत्र आळंदी ग्रामस्थ इंद्रायणी आरती ग्रुप, राजमाता जिजाऊ महिला प्रतिष्ठान, महिला बचत गट सदस्य, आळंदी जनहित फाउंडेशन, पत्रकार, पदाधिकारी, महिला मंडळ तसेच आळंदी ग्रामस्थ यांचे वतीने इंद्रायणी नदी घाटावर घाट स्वच्छता करीत इंद्रायणीची आरती हरिनाम गजरात झाली.
यावेळी राजमाता जिजाऊ महिला प्रतिष्ठान अध्यक्षा अनिता झुजम, विद्या आढाव, अनिता शिंदे, उषा नेटके, चारुशीला पोटफोडे, राधा घुंडरे, शोभा फासगे, कल्याणी मालक, राणी वाघ, पार्वती गव्हाणे, शोभा कुलकर्णी, माजी नगरसेविका उषाताई नरके, लता वर्तुळे, नंदा महाडिक, अरुणा जगताप, सुनीता माने, रेखा मनुरे, उज्वला जुमले, अश्विनी धोटे, आळंदी जनहित फाउंडेशनचे कार्याध्यक्ष संयोजक अर्जुन मेदनकर, राजेश नागरे, सोमनाथ बेंडाले, सरपंच विजय सुतार, माऊलींचे मानकरी गणपत कुर्हाडे पाटील, राजेंद्र जाधव आदीं सह मोठ्या संख्येने महिला, आळंदीकर ग्रामस्थ, भाविक उपस्थित होते.
इंद्रायणी नदीचे पावित्र्य जोपासण्याचे आवाहन करीत इंद्रायणी नदी घाटावर आरती उपक्रम राबविण्यात आला. या उपक्रमात सर्वानी सहभागी व्हावे असे आवाहन राजमाता जिजाऊ महिला प्रतिष्ठान अध्यक्षा अनिता झुजम यांनी केले. इंद्रायणी नदीचे प्रदूषण दूर करण्यासाठी शासनाने तात्काळ उपाय योजना कराव्यात असे आवाहन त्यांनी केले. यावेळी महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. स्वच्छ आळंदी, सुंदर आळंदी हरित आळंदीसाठी जनजागृती करण्यात आली. इंद्रायणी नदीत निर्माल्यादी वस्तू, कपडे कचरा, तुटलेले फोटो, काचा न टाकण्याचे आवाहन करण्यात आले. तीर्थक्षेत्र आळंदी ग्रामस्थ इंद्रायणी आरती ग्रुपचे वतीने अनिता झुजम, संयोजक अर्जुन मेदनकर यांनी उपक्रमाचे आयोजन केले.