इंदिरा एकादशी आळंदी मंदिरात लक्षवेधी पुष्प सजावट
लाखावर भाविकांची दर्शनास गर्दी
सत्यविचार न्यूज :
आळंदी येथील श्री ज्ञानेश्वर महाराज मंदिरात इंदिरा एकादशी दिनी लक्षवेधी पुष्प सजावट श्रींचे गाभाऱ्यात करण्यात आली होती. लाखावर भाविकांनी दर्शनास गर्दी करून श्रींचे दर्शन घेतल्याचे देवस्थानचे व्यवस्थापक माउली वीर यांनी सांगितले.
आळंदी मंदिरातील प्रथा परंपरांचे पालन करीत श्रींचे वैभवी गाभाऱ्यात विविध रंगी आकर्षक फुलांचा वापर करीत पुष्प सजावट करण्यात आली होती. मंदिरात इंदिरा एकादशी निमित्त खिचडी महाप्रसाद आळंदी देवस्थान तर्फे वाटप करण्यात आले. आळंदीतील इंद्रायणी नदी घाटावर दुतर्फ़ा भाविकांनी गर्दी करून स्थान माहात्म्य जोपासत तीर्थ प्राशन करीत स्थान माहात्म्य जोपाले. वारकरी भाविकांनी हरिनाम गजरात नगरप्रदक्षिणा करीत एकादशी साजरी केली. परंपरांचे पालन करीत आळंदी मंदिरात धार्मिक कार्यक्रम महाप्रसाद, महानैवेद्य झाला. विणा मंडपात देहूकर महाराज यांचे वतीने गणेश महाराज साळुंखे यांचे हरिकीर्तनसेवा मंत्रमुग्ध करणाऱ्या वाणीतून झाली. कीर्तनास भाविकांनी गर्दी केली.