महाबळेश्वर : आयपीएल २०२३ मध्ये चेन्नई सुपरकिंग्जला चॅम्पियन बनवणारा धडाकेबाज स्टार ओपनर ऋतुराज गायकवाड आज शनिवारी विवाहबंधनात अडकला. चेन्नई सुपरकिंग्जसाठी या वर्षी शानदार कामगिरी करून दाखवणाऱ्या ऋतुराजने उत्कर्षा पवारसोबत लगीनगाठ बांधली. ऋतुराजने आपल्या विवाहाचे सुंदर फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. त्यावर प्रतिक्रियांच पाऊस पडत आहे.भारताचा युवा व चेन्नई सुपर किंग्सचा स्टार फलंदाज ऋतुराज गायकवाडचा काल दिनांक 3 जून रोजी त्याचीच दीर्घकाळ असलेली मैत्रीण उत्कर्षा पवार हिच्याशी विवाह झाला. महाराष्ट्रातल्या सातारा जिल्ह्यातील महाबळेश्वर येथे दोघांनी लग्नगाठ बांधली. 26 वर्षीय ऋतुराजने स्वतःच्या लग्नातील फोटो इंस्टाग्राम वर टाकले व त्याला कॅप्शन दिले की , ” खेळपट्टीपासून वेदीवर, आमचा प्रवास सुरु (Ruturaj Gaikwad) होतो !”
गायकवाडचे सीएसके सहकारी शिवम दुबे आणि प्रशांत सोलंकी विवाह सोहळ्यात उपस्थित होते. देवदत्त पाडिक्कल आणि रजत पाटीदार यासारख्या इतर खेळाडूंनी इंस्टाग्रामवर नव्या जोडप्याचे अभिनंदन केले. ऋतुराजच्या इंस्टाग्राम पोस्टवर शिखर धवन, युजवेंद्र चहल, श्रेयस अय्यर, दीपक चाहर, तिलक वर्मा, अंबाती रायुडू, लुंगी एनगिडी, राहुल चाहर आदी खेळाडूंनी इन्स्टावरील टिप्पणी द्वारे शुभेच्छा दिल्या.
ऋतुराजची पत्नी उत्कर्षा ही सुद्धा पुण्याचीच असून ती सुद्धा महराष्ट्रसाठी क्रिकेट खेळते. ऋतुराजचे सुद्धा हे वर्ष क्रिकेटमध्ये चांगले गेले आहे. त्याने यावर्षी स्वतःची दुसरी आयपीएल ट्रॉफी जिंकली. 590 धावांसह गायकवाडने आयपीएलमध्ये यश मिळवताच आयुष्यातही एक पाऊल पुढे टाकले (Ruturaj Gaikwad) आहे.
![](https://satyavichar.in/wp-content/uploads/2023/06/Screenshot_20230605-055713_Instagram.jpg)