आत्मा अंतर्गत जनावरांमधे उच्च वंशावळी च्या कालवडीची पैदास व उपाय योजना या विषयावरील प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन
कृषि विभागाच्या कृषि तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा), व ग्रामपंचायत धामणे यांच्या संयुक्त विद्यमाने मौजे धामणे ता. खेड येथे जनावरांमधे उच्च वंशावळी च्या कालवडीची पैदास व उपाय योजना या विषयावरील प्रशिक्षणाचे आयोजन प्रकल्प संचालक आत्मा पुणे विजय हिरेमठ व तालुका कृषि अधिकारी नंदकुमार वाणी यांच्या मार्गदर्शनाखाली तालुका तंत्रज्ञान व्यवस्थापक दिनेश सावंत यांनी केले होते. प्रशिक्षण कार्यक्रमात मार्गदर्शन करण्यासाठी ABS India चे विक्री व्यवस्थापक निलेश लगड , मंडल कृषि अधिकारी घनशाम अभंग हे मान्यवर उपस्थित होते.
ए. बी. एस. कंपनीचे निलेश लगड यांनी कृत्रिम रेतनाची सुविधा माजावर आलेल्या प्रत्येक जनावरासाठी उपलब्ध झाल्यास अनुवंश विकासाद्वारे उत्पादन क्षमतेत वाढ होईल, आणि योग्य पैदाशीमुळे अनुत्पादक पशुंची संख्या कमी होईल. दैनंदिन दूध उत्पादनामध्ये गोठ्यात उच्च प्रतीच्या गायींचे प्रमाण कमी झाले आहे . चालू परिस्थिती मध्ये दूध उत्पादक चांगल्या गायीच्या खरेदीसाठी पंजाब,कर्नाटक किंवा इतर राज्यात जात आहेत.दूध उत्पादन वाढवायचे असल्यास स्वतःच्या गोठ्यात कालवडी जोपासणे फार गरजेचे आहे त्यामुळे रोगप्रतिकारक क्षमता जास्त असणारे व कमी चारा खाऊन जास्तीत जास्त उत्पादन देणाऱ्या कालवडींची पैदास करणे ही काळाची गरज आहे.प्रत्येक पशुपालक शेतकऱ्यास या तंत्राचे महत्त्व समजण्यासाठी निलेश लगड यांनी मार्गदर्शन करून ए.बी.एस इंडिया कंपनीचे लिंग निर्याधित विर्यमात्रा वापरण्याचे आवाहन केले.
श्री घनशाम अभंग यांनी कृषि विभागाच्या विविध योजनांची माहिती दिली तर श्रीमती ज्योती राक्षे यांनी सोयाबीन बियाणे उगवण क्षमता चाचणीचे प्रात्यक्षिक घेऊन बीज प्रक्रिया व बीबीएफ तंत्रज्ञानाबद्दल शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले.
या कार्यक्रमास सरपंच महेंद्र कोळेकर, संभाजी कोळेकर, बारकु सातपुते , ज्ञानेश्वर कोळेकर इ धामणे गावातील पशुपालक बहुसंख्येने उपस्थित होते.
या कार्यक्रमाचे नियोजन अंकुश कोळेकर व तालुका तंत्रज्ञान व्यवस्थापक दिनेश सावंत यांनी केले.
सुत्रसंचालन अरुन करंडे व आभार तानाजी कोळेकर यांनी केले.