आय टी आय (आय एम सी) प्रवेश व्यवसाय प्रशिक्षण शुल्क प्रतिपूर्ती योजना
सत्यविचार न्यूज :
शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, चांडोली ता.खेड , राजगुरुनगर येथे दिनांक १५ जुलै २०२४ पासून प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे. संस्थेत एकूण ४२८ जागांसाठी भरती प्रक्रिया सुरू असून यामधील २० टक्के जागा संस्था व्यवस्थापन समिती (आय.एम.सी) कोट्यातून भरल्या जाणार आहेत. तरी सदर आय एम सी कोट्यातील जागांवर प्रवेशासाठी उमेदवाराने दिलेल्या प्रवेश शुल्काची प्रतिपूर्ती योजना सुरू आहे.
ज्या विद्यार्थ्यांची गुणवत्तेनुसार जाहीर झालेल्या सर्वसाधारण यादीत निवड होऊ शकत नाही, त्या विद्यार्थ्यांना संस्थेत आय.एम. सी. कोट्यातून प्रवेश घेण्याची संधी उपलब्ध असते. तसेच या प्रवेशासाठी त्या विद्यार्थ्याने भरलेल्या शुल्काची प्रतिपूर्ती करण्याची तरतूद सुद्धा उपलब्ध आहे. त्यासाठी आवश्यक त्या गोष्टींची व कागदपत्रांची पूर्तता केली तर प्रवेश शुल्काचा ८० ते १०० टक्के परतावा विद्यार्थ्याच्या बँक खात्यात थेट जमा करण्यात येत असतो. त्यामुळे विद्यार्थ्यांनी आपल्या प्रवेश खात्यात ऑनलाईन पद्धतीने व्यवसाय निहाय निवड नोंदविताना व्यवसायाच्या नावासोबत आय एम सी हा पर्याय सुद्धा नक्की नोंदवून आपला प्रवेश निश्चित होण्यासाठी प्रयत्न करावेत. या विषयी जास्त मार्गदर्शनासाठी संस्थेत भेट द्यावी. असे आव्हाहन संस्था व्यवस्थापन समिती सचिव मा. कमलेश पवार यांनी केले आहे.
![](https://satyavichar.in/wp-content/uploads/2024/07/1000600525-1024x1001.jpg)