अध्यक्षपदी कड, उपाध्यक्षपदी बागडे
सत्यविचार न्यूज :
कुरुळी येथील विविध कार्यकरी सहकारी सेवा संस्थेच्या अध्यक्षपदी साहेबराव कड तर उपाध्यक्षपदी तान्हाजी बागडे यांची बिनविरोध निवड झाल्याचे संस्थेचे सचिव चंदन पानसरे यांनी सांगितले.
कुरुळी संस्थेच्या सर्व संचालकांना काम करण्याची संधी मिळावी म्हणून अध्यक्ष हनुमंत गायकवाड व उपाध्यक्षा कल्पना डोंगरे यांनी स्वखुशीने पदाचा राजीनामा दिला असल्याने या रिक्त जागेसाठी खेड तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभागृहात निवडणूक निर्णय अधिकारी एस. एम. बगाटे यांच्या अध्यक्षतेखाली निवडणूक घेण्यात आली. यावेळी अध्यक्षपदासाठी साहेबराव कड तर उपाध्यक्षपदासाठी तान्हाजी बागडे यांचा सर्वानुमते अर्ज दाखल करण्यात आले असल्याने त्यांची विनविरोध निवड झाल्याचे बगाटे यांनी घोषित केले.
यावेळी मावळते अध्यक्ष हनुमंत गायकवाड, उपाध्यक्षा कल्पना डोंगरे, संचालक बाजीराव बधाले, रामनाथ सोनवणे, भाऊसाहेब कांबळे, जालिंदर वेताळ, पोपट मुन्हे, कमल कड प्रकाश ढोले, उत्तम सोनवणे, भास्कर मुन्हे, रामदास मुन्हे, सहसचिव संतोष लिंभोरे उपस्थित होते. यावेळी नवनिर्वाचित अध्यक्ष, उपाध्यक्ष यांचा संस्थेच्या वतीने शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.