मॉडर्न हायस्कूल भोसे येथील विद्यार्थ्यांनी अनोख्या पद्धतीने साजरी केली गुरु पौर्णिमा
मा पतंप्रधान नरेंद्रजी मोदी साहेब यांच्या ‘एक पेड माँ के नाम ‘ या उपक्रमाच्या धर्तीवर ‘एक झाड गुरुंसाठी ‘ हा अनोखा उपक्रम
सत्यविचार न्यूज :
शिक्षकांचा सन्मान आणि कृतज्ञता व्यक्त करण्यसाठी समर्पित दिवस म्हणजे गुरुपौर्णिमा. तरूण मनांना घडवण्यात आणि उज्जवल भविष्यासाठी मार्गदर्शन करण्यात शिक्षकांचे अमूल्य योगदान ओळखून मॉडर्न हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय भोसे प्रशालेमध्ये मोठ्या उत्साहत गुरुपौर्णिमा साजरी करण्यात आली अशी माहिती महाविद्यालयाच्या प्राचार्या सीमा कुळधरण यांनी दिली.
अज्ञानरूपी अंधकारात ज्ञानाची ज्योत तेवत ठेवणे महत्त्वाचे आहे. ‘ गुरु बिन कौन बताए बाट , बड़ा बिकट यमघाट ” अशा परिस्थितीत योग्य वाट दाखविण्याचे काम आपले गुरुजन करत असतात. गुरु म्हणजे जो लघु नाही, गुरु म्हणजे मोठा , विशाल . गुरु म्हणजे शिक्षक मार्गदर्शक जो आपल्याला ज्ञान , संस्कार आणि योग्य मार्गदर्शन प्रदान करतो.
याच गुरुपौर्णिमेनिमित्त प्रशालेमध्ये वर्ग सजावट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. तसेच भारत देशाचे पतंप्रधान नरेंद्रजी मोदी साहेब यांच्या ‘एक पेड माँ के नाम ‘ या उपक्रमाच्या धर्तीवर निसर्गाबद्दलची गुरुत्वाची भावना ‘ एक झाड गुरुंसाठी ‘ हा अनोखा उपक्रम प्रशालेत राबवून वृक्षारोपण केले व त्यांची निगा राखण्याचा निश्चयही केला.
या स्तुत्य उपक्रमाचे प्रोग्रेसिव्ह एज्युकेशन सोसायटीचे कार्याध्यक्ष डॉ गजानन एकबोटे , कार्यवाह शामकांत देशमुख , सहकार्यवाह ज्योत्सना एकबोटे , शाळा समिती अध्यक्ष सुरेश तोडकर ,व्हिजीटर उद्धव खरे, शाळा समिती सदस्य प्रमोद शिंदे , राजीव कुटे पालक संघाचे उपाध्यक्ष रमेश लोणारी ,सर्व शिक्षक व पालकांनी कौतुक केले.