निघोजे सोसायटी अध्यक्ष, उपाध्यक्ष बिनविरोध.
निघोजे येथील विविध कार्यकारी सहकारी सेवा संस्थेच्या अध्यक्षपदी बेबीताई येळवंडे तर उपाध्यक्षपदी विकास येळवंडे यांची बिनविरोध निवड झाल्याचे संस्थेचे सचिव चंदन पानसरे यांनी सांगितले.
निघोजे संस्थेच्या सर्व संचालकाना काम करण्याची संधी मिळावी म्हणून संस्थेचे अध्यक्ष यशवंत फडके, उपाध्यक्ष जितेंद्र आल्हाट यांनी स्वुशीने पदाचे राजीनामे दिले होते. त्यामुळे या रिक्त जागेसाठी निवडणूक निर्णय अधिकारी एस. एम. बगाटे यांच्या अध्यक्षतेखालील खेड तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभागृहात घेण्यात आलेल्या अध्यक्ष पदासाठी बेबीताई येळवंडे व उपाध्यक्षपदासाठी विकास येळवंडे यांचे सर्वानुमते अर्ज दाखल करण्यात आले असल्याने दोघांचीही बिनविरोध निवड झाल्याचे निवडणूक निर्णय निर्णय अधिकारी एस. एम. बगाटे यांनी घोषित केले.
यावेळी मावळते अध्यक्ष यशवंत फडके, जितेंद्र आल्हाट, सचांलक स्वामी येळवंडे, कैलास येळवंडे, सत्यवान येळवंडे, अमित येळवंडे, बाळासाहेब पानसरे विकास येळवंडे, मीराबाई मराठे, बाळासाहेब भंडलकर, सुरेश शिंदे, योगेश येळवंडे, गजानन येळवंडे, सहसचिव संतोष लिंभोरेउपस्थित होते. यावेळी नवनिर्वाचित अध्यक्ष व उपाध्यक्ष यांचा संस्थेच्या वतीने शाल श्रीफळ, पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.
यावेळी नवनिर्वाचित अध्यक्षा, उपाध्यक्ष म्हणाले की, चालू वर्षी ३७० सभासदांना ३ कोटी २५ लाख रुपयांचे पीक कर्ज वाटप करण्यात आले असून दरवर्षी १०० टक्के वसुली करण्यात आली आहे. पुढील वर्षी शेतकरीवर्गना जास्तीत जास्त पीक कर्ज मिळवून देण्याचा प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी नमूद केले.