चाकण येथे चक्रेश्वर मंदिर परिसरात ५१ झाडांचे वृक्षारोपण.
सत्यविचार न्यूज :
चाकण : प्रतिनिधी
राजगुरुनगर सहकारी बँकेचे विद्यमान संचालक व पुणे जिल्हा परिषदेचे माजी सदस्य स्वर्गीय किरणशेठ वसंतराव मांजरे यांच्या स्मृतिप्रित्यर्थ मांजरे कुटुंबीयांच्या वतीने चाकण येथील चक्रेश्वर मंदिर परिसरात विविध प्रकारच्या ५१ झाडांचे वृक्षारोपण करण्यात आले.
खेड तालुक्याचे माजी आमदार ऍड. रामभाऊ कांडगे, उद्योजक बाळासाहेब मांजरे व युवा उद्योजक सचिन मांजरे यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. यावेळी समाज प्रबोधनकार ह. भ. प. मुक्ताजी नाणेकर, उद्योगपती प्रकाश मांजरे, युवक काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष आतिश मांजरे, तुषार मांजरे, पराग मांजरे, कमलेश पठारे, अनिल देशमुख, अमोल जाधव, वनाधिकारी बाळासाहेब गवते, अरुण देशमुख आदी सह विविध क्षेत्रातील प्रतिष्ठित मान्यवर व ग्रामस्थ उपस्थित होते.
उद्योजक सचिन मांजरे यांनी सांगितले की, किरण शेठ मांजरे यांना समाजसेवेची आवड होती. त्यांच्या आठवणी चिरंतन काळ टिकून राहव्यात म्हणून चाकण येथे वृक्षारोपण करण्यात आले. त्याचप्रमाणे स्वर्गीय आमदार वसंतराव मांजरे विद्यालय परिसरातही वृक्ष लागवड करण्यात आली. यावेळी निवृत्त वनाधिकारी बाळासाहेब गवते यांनी या वृक्ष लागवडीचे संगोपन करण्याची जबाबदारी स्वीकारली. भविष्यकाळात असेच लोकोपयोगी उपक्रम राबवणार आहे.