मुलीचा विनयभंग व पोस्को कायद्या अंतर्गत दाखल असलेल्या गुन्ह्याच्या तपासा कामी पारगाव पोलीस स्टेशन येथे बोलावले असता तीन जणांनी आमचा या गुन्ह्याची काही संबंध नाही असे म्हणत पोलिसांशी हूज्जत घालत शासकीय कामात अडथळा आणला होता या प्रकरणी पारगाव पोलीस ठाण्यात भाऊ महादू खुडे, ओंकार भाऊ खुडे व साहिल भाऊ खुडे (सर्व रा काटापुर बुद्रुक ता आंबेगाव) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे सदर घटना १०/०५/२०२३ रोजी घडली आहे याबाबतची फिर्याद पारगाव पोलीस ठाण्याचे पोलीस शिपाई अक्षय भाऊसाहेब कमळकर यांनी दिली आहे. पुढील तपास पारगाव पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक लहू थाटे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस सब इन्स्पेक्टर घोडके करत आहेत