चाकण |-
रासे (ता. खेड, जि.पुणे ) येथील जेष्ठ सामाजिक कार्यकर्त्या विमलताई वाल्मीक वाडेकर यांचे अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या पश्चात दोन मुले, दोन मुली, सुना, जावई, नातवंडे असा मोठा परिवार आहे. स्व.वाल्मीक रघुनाथ वाडेकर गुरुजी यांच्या पत्नी होत्या. तसेच चाकण औद्योगिक वसाहतीतील कामगार नेते व राष्ट्रीय श्रमिक एकता महासंघाचे महाराष्ट्र राज्याचे सचिव व लॉरीयाल कामगार संघटनेचे अध्यक्ष अविनाश वाडेकर आणि विशाल गार्डन सहकारी गृहनिर्माण सोसायटीचे चेअरमन अनिकेत वाल्मीक वाडेकर यांच्या त्या आई होत. रासे गावचे माजी आदर्श सरपंच विजयभाऊ शिंदे यांच्या त्या मावशी होत.
दशक्रिया विधी:- दहाव्या दिवशी रविवार दिनांक १४/०५/२०२३ रोजी सकाळी आठ वाजता रासे (ता. खेड) गाव येथे होणार आहे