सत्यविचार न्यूज :
खेड तालुक्यातील पश्चिम व पुर्व पट्ट्याला वरदान ठरलेले कळमोडी धरण १०० टक्के भरले आहे. कळमोडी धरणातील सांडव्यावरून पुर्ण क्षमतेने पाण्याचा विसर्ग आरळा नदी पात्रात होत असल्याची माहीती धरण प्रशासनाने दिली आहे. सलग दुसऱ्या वर्षीही जिल्ह्य़ातील सर्वप्रथम शंभर टक्के भरलेले कळमोडी धरण आहे. हा प्रकल्प भरून वाहू लागल्याने पश्चिम भागातील नागरिकांकडून तसेच शेतकऱ्यांमध्ये समाधान व्यक्त होत आहे.
कळमोडी धरण रविवारी (दि. २१) पहाटे पुर्ण क्षमतेने भरताच पाठी साडेपाचच्या दरम्यान धरणाच्या सांडव्यावरून पाणी वाहण्यास सुरूवात झाली आहे. धरणात चार वर्षापासून पुर्ण क्षमतेने पाणीसाठा होण्यास सुरूवात झाली होती. या धरणाला दरवाजे नसल्याने पाण्याचा विसर्ग सांडव्यामार्गे होतो. धरण भरताच सांडव्यावरून वेगाने पाणी वाहण्यास सूरूवात झाली आहे.
कळमोडी धरण परिसरात उशिरा का होईना पावसाचा समाधानकारक जोर असल्याने धरणाच्या पाणीसाठ्यात वेगाने वाढ होवून धरण १०९ % भरले. धरणाची ४२.८७ द.ल.घ.मी. म्हणजेच १.५१ टीएमसी पाणीसाठा क्षमता आहे. कळमोडी धरण भरल्यानंतर चास कमान धरणाच्या जलसाठा वाढण्यास मदत होते .१ जुनपासून ४६६ मी.मी. पावसाची नोंद झाली असून गतवर्षी १७ जुलैला भरलेल्या धरणाला चालुवर्षी २१ जुलै हा दिवस उजाडला आहे. कळमोडी धरण भरल्याने या धरणातून बाहेर पडणारे पाणी चास कमान धरणात येत असल्याने चासकमान धरणातील पाणीसाठा वेगाने वाढण्यास मदत होणार आहे.
आंबेगाव तालुक्यातील सातगाव पठार या भागासाठी आरक्षित पाणी चासकमान प्रकल्पाचा घळभरणीसाठी वापरण्यात येते, परंतु प्रकल्पासाठी कालवा नसल्याने आरळा नदीच्या पात्रातून पाण्याचे वितरण केले जाते. त्यामुळे कळमोडी, चिखलगाव, साकुर्डी, देवोशी व अंतर्गत कुडे, बांगरवाडी, येनिये या गावातला सुद्धा पाण्याचा मोठ्या प्रमाणावर फायदा होतो. पश्चिम भागातील अनेक गावाच्या पाणीपुरवठा योजना ह्या कळमोडी प्रकल्पावर अवलंबून असल्याने पिण्याचा पाण्याचा प्रश्न सुद्धा या निमित्ताने सुटला आहे.
प्रत्यक्षात धरणाची साठवण क्षमता जरी १.५१ टीएमसी आली तरी अंतर्गत राडारोडा असल्याने पाणी साठवन पूर्ण क्षमतेने होत नाही . आत मध्ये असणारा राडारोडा काढण्याची मागणी गेली अनेक वर्षांपासून सातत्याने ग्रामस्थ व शेतकरी वर्गात केले जात आहे. सुरवातीला पावसाचे प्रमाण कमी असल्याने शेतकरी चिंतातूर झाले होते परंतु धरण भरल्याने शेतकरी वर्ग आनंदी असल्याचे पहावयास मिळाले. प्रशासनाच्या वतीने नदी खालील सर्व गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला असून नदीपात्रातील शेतीविषयक औजारे वा तत्सम साहित्य अथवा जनावरे यांना तत्काळ सुरक्षित ठिकाणी हलविण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
पुणे जिल्ह्यातील पहिलं धरण ओव्हरफ्लो झाल्याचं समोर आलंय. खेड आणि शिरुर तालुक्यासाठी वरदान ठरत आहे. कारण यंदा कळमोडी धरणाला पुणे जिल्ह्यात सर्वात पहिलं भरल्याचा मान मिळालाय. मागील काही दिवसापासून संततधार पाऊस सुरू आहे. त्यामुळे हे धरण पूर्ण भरलं असल्याची माहिती मिळतेय.
पुणेकरांसाठी खुशखबर
सह्याद्रीच्या कुशीत भिमाशंकर परिसरात गेल्या आठ दिवसांपासुन पाऊसाची संततधार सुरु आहे. त्यामुळे आरळा नदीवर असणारे कळमोडी धरण पुर्ण क्षमतेने भरले (Kalamodi Dam Overflow) आहे. या धरणातुन आरळा नदीतुन चास-कमान धरणात ५०० क्युसेसने पाण्याचा विसर्ग सुरु करण्यात आलाय. भिमाशंकरच्या परिसरात पाऊसाची संततधार अशीच सुरु राहिल्यास चास-कमान धरणाची पाणी पातळीही झपाट्याने वाढणार आहे. त्यामुळे प्रशासनाकडुन नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात (Rain Update) आलाय.
पुणे जिल्ह्यातील पहिलं धरण ओव्हरफ्लो
कळमोडी धरण खेड तालुक्यातील पश्चिम भागात (Pune News) आहे. या धरणाची साठवण क्षमता १.५ टीएमसी आहे. कळमोडी धरण पूर्ण क्षमतेने भरल्याचं समोर आलंय. या धरणामधून आरळा नदीत पाण्याचा विसर्ग सुरु करण्यात आलाय. नदीकाठच्या गावांना आणि नागरिकांना पूराचा धोका आहे. त्यामुळे प्रशासनाकडून त्यांना सतर्कतेचा इशारा देखील देण्यात आल्याची माहिती मिळतेय. हे धरण भरल्यामुळे पुणेकरांवरील पाणीसंकट काहीसं दुरावलं आहे. त्यामुळे पुणेकरांसाठी ही दिलासादायक बातमी आहे.
कळमोडी धरण पूर्ण क्षमतेनं भरलं
पुणे जिल्ह्यामध्ये मागील काही दिवसांपासून घाटमाध्यावर पावसाने दमदार हजेरी लावल्याचं वृत्त आहे. त्यामुळे खेड तालुक्यातील कळमोडी धरणाच्या पाणलोट क्षेत्रातील खरपूड, भोमाळे, परसूल, घोटवडी परिसरात देखील मुसळधार पाऊस (Pune District Water Storage) पडलाय. या पावसामुळे धरण भरण्यात मोठी मदत झालेली आहे. पाणीसाठ्यामध्ये झपाट्याने वाढ झाल्यामुळे कळमोडी धरण ‘ओव्हरफ्लो’ झालंय. यामुळे आता चासकमान धरणातील पाणीसाठ्यात देखील वेगाने वाढ होणार आहे.