माऊली सेवा प्रतिष्ठानच्या माध्यमातून गरजु विद्यार्थ्यांना शालेय वस्तूंचे वाटप…
सत्यविचार न्यूज :
माऊली सेवा प्रतिष्ठान, राजगुरुनगर या सामाजिक संस्थेच्या माध्यमातून खेड तालुक्यातील सतूरके वस्ती (वाडा)
जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या ३४ विद्यार्थ्यांना रेनकोट व स्कुलपॅड आणि खरोशी येथील जिल्हा परिषद शाळेतील ३० विदयार्थ्यांना स्कुल पॅड आणि वह्या यांचे वाटप करण्यात आले.
ग्रामीण भागातील गरजु विद्यार्थ्यांना
वाटप करण्यासाठी रेनकोट व स्कुलपॅड श्री क्षेत्र महाळुंगे इंगळे येथील उद्योजक किशोर चिंचवडे तसेच स्वर्गीय खासदार बाळासाहेब आपटे स्मृती समितीचे अध्यक्ष गणेश सांडभोर, सचिव स्वानंद खेडकर, आणि लायन्स क्लब ऑफ राजगुरूनगर अध्यक्ष नितीन दोंदेकर यांनी तर वह्याचे सौजन्य विजय नाना कौदरे यांनी माऊली सेवा प्रतिष्ठानच्या माध्यमातून हे शैक्षणिक साहित्य
वाटप केले.
यावेळी भीमाशंकर देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष ॲड. सुरेशभाऊ कौदरे, माऊली सेवा प्रतिष्ठानचे अध्यक्ष कैलास दुधाळे ,अविनाश पाटील, अक्षय केदारी, वासुदेव गोपाळे, प्रियांका वाडेकर, शिवाजी हिले,संतोष हुंडारे, भोलेनाथ कौदरे, गोरक्षभाऊ कौदरे, नितीन भाऊ कौदरे, काळुराम कौदरे,
मुख्याध्यापक अनिल बोऱ्हाडे, सुदाम सुपे. विद्या शिंदे. सुषमा भोये. मुख्याध्यापिका शमा घोडके, शिक्षक सुदाम सुपे. विद्या शिंदे. सुषमा भोये, भरत चिंचकर आदी मान्यवर उपस्थित होते..