कंटेनर समोर गाडी आडवी आणत (Mahalunge) चालकाला मारहाण करणाऱ्या व गाडीची तोडफोड करणाऱ्या दोघांना पोलिसांनी अटक केली आहे. ही घटना रविवारी (दि.30) निघोजे- महाळुंगे रोडवर घडली आहे.
याप्रकरणी कंटेनर चालक रामअधिन भिलमन यादव (वय 33 रा.उत्तरप्रदेश) यांनी सोमवारी (दि.1) महाळुंगे पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून अविनाश सुरेश मोरे (वय 20 रा.खेड) व त्याचा साथीदार अजय तुळशीराम गवळी (वय 19 रा.निघोजे) यांना पोलिसांनी अटक केली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे त्यांच्या ताब्यातील कंटेनर मध्ये स्क्वॉडा कंपनीच्या कार घेऊन जात होते. यावेळी आरोपींनी त्यांची गाडी फिर्यादीच्या कंटेनर समोर आणली. यावेळी फिर्यादींनी त्यांचा कंटेनर बाजूला घेतला. यावेळी आरोपींनी फिर्यादीला गाडीच्या बाहेर काढत मारहाण केली.
तसेच फिर्यादींनी का मारताय म्हणून विचारले असता त्याच्या खिशातील 800 रुपये काढून घेतले.यावेळी आरोपींनी फिर्यादीच्या कंटेनरच्या दगडाने काचा फोडत नुकसान केले. यावरून म्हाळुंगे पोलिसांनी आरोपींना अटक केली असून पोलीस पुढील तपास करत (Mahalunge) आहेत.