महाळुंगे (ता. खेड) येथील न्यु इंग्लिश स्कुल मध्ये घेतलेल्या तत्कालीन विद्यार्थ्यांचा दहावीचा वर्ग 33 वर्षांनी भरला. तत्कालीन शिक्षकांनी आपल्या खास शैलीत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. विद्यार्थीही आठवणीत रममाण झाले. यावेळी दैवतासमान शिक्षकांना माजी विद्यार्थ्यांच्या हस्ते जीवनगौरव पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. यामुळे तत्कालीन शिक्षक भारावून गेले. हीच आमच्या शैक्षणिक क्षेत्रात कामाची पावती असल्याने भावना शिक्षकांनी व्यक्त केली. यावेळी उपस्थित माजी विद्यार्थ्यांना आदर्श विद्यार्थी पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.
जनता शिक्षण संस्थेच्या म्हाळुंगे येथील न्यु इंग्लिश स्कुल महाळुंगे १९९० मध्ये दहावीच्या वर्गातील माजी विद्यार्थ्यांचा स्नेहमेळावा तत्कालीन शिक्षकांच्या उपस्थितीत झाला. शाळेच्या आवारातील व्यासपीठावर माजी विद्यार्थ्यांचा मेळावा झाला.
अध्यक्षस्थानी सेवानिवृत्त ज्येष्ठ मुख्याध्यापक मारुती विठोबा जैद होते.
यावेळी सेवानिवृत्त ज्येष्ठ शिक्षक शेळके सर, सेवानिवृत्त क्षीरसागर सर, सेवानिवृत्त कढने सर, न्यू इंग्लिश स्कूल व ज्युनिअर कॉलेज हिंजवडीचे प्राध्यापक ओतारी सर उपस्थित होते. माजी विद्यार्थी संदीप बोत्रे यांनी प्रास्ताविक केले.राजेंद्र भांगरे यांनी शिक्षकांच्या कार्याचा गौरव करताना शिक्षकांनी दिलेल्या ज्ञानाच्या शिदोरीवर विद्यार्थी आपल्या क्षेत्रात सन्मानाने कार्य करत असल्याचे सांगितले.
यावेळी बाळासाहेब दवणे, सुंदर पांढरकर, आशा पवार, हेमंत मिंडे, दिलीप दामोदर पवार यांनी मनोगतात शिक्षकांच्या शिकवण्याची पद्धती सांगत आदरभाव व्यक्त केला.
यानंतर सेवानिवृत्त ज्येष्ठ शिक्षक यांना माजी
शेळके सर, सेवानिवृत्त क्षीरसागर सर, सेवानिवृत्त कढने सर यांना विद्यार्थ्यांच्या हस्ते शाल, गुलाब पुष्प व सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले.
या मेळाव्यास देविदास वाळके, अंकुश शेळके, गोरक्षनाथ भांगरे, कुंदा बोऱ्हाडे, राजश्री फलके, माया बोत्रे, सुशीला पवार, लक्ष्मण लांडगे, अमोल बुट्टे, शिवाजी पारधी, माणिक सप्रे, दादू केदारी, उल्हास शिवळे पाटील, मोहन लांडगे, बाबाजी कामठे, श्रीधर मांडेकर, कैलास कांबळे, राजेंद्र येळवंडे, हे माजी विद्यार्थी सहभागी झाले होते. सूत्रसंचालन संदीप बोत्रे यांनी केले. किरण गाडे यांनी आभार मानले.