सत्यविचार न्यूज :
कोरेगाव खुर्द येथील हनुमान मंदिरात चोरी – पितळी घंटा चोरीला गेल्याची मंदिरातील दुसरी घटना..
खेड तालुक्यात कोरेगाव खुर्द येथे चोरट्यांनी गावातील गावठाण मधील हनुमान मंदिर फोडून मंदिरातील पितळी घंटाअसा हजारोंचा ऐवज चोरून नेला.
ही घटना (दि १५ जुलै) रोजी रात्रीच्या सुमारास घडली. दिवसेंदिवस कोरेगाव परिसरात चोरीच्या घटना वाढत आहे.
कोरेगाव येथील गावठाणात हनुमान मंदिर आहे. या मंदिरात रात्रीच्या सुमारास चोरट्यांनी प्रवेश करून या मंदिरातील पितळी घंटे चोरून नेले.
सकाळी पुजारी प्रभाकर दोंदे मंदिरात पूजेसाठी व दर्शनासाठी गेल्यावर चोरी झाल्याचा प्रकार उघडकीस आला.
घंटा चोरीची हि दुसरी घटना आहे, या अगोदर सहा महिन्यांपूर्वी याचं मंदिरातील घंट्याची चोरी झाली होती. कष्ट न करता सहज पैसा उपलब्ध होतो हे चोरट्यांना चांगलेच फावले आहे. गावच्या बाहेर मंदिर असल्याने चोराला चांगले फावले आहे. घंटा चोरी झाल्यामुळे गावातील नागरिकांकडून नाराजी व्यक्त होत आहे .असे सरपंच राजु झांबरे आणि मा. तंटामुक्ती अध्यक्ष काळुराम गोगावले यांनी सांगितले.
मंदिरात चोरी म्हणजे नागरिकांच्या अस्मितेचा प्रश्न आहे, मंदिरातील चोऱ्या वाढल्या असल्याचे चित्र दिसत आहे.
आता तरी पोलीस प्रशासनाने वाढत्या चोरीच्या घटनांकडे लक्ष द्यावे अशी मागणी परिसरातून होत आहे