भोसे – येथील भोसे विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थेच्या चेअरमनपदी प्रताप सदाशिव चव्हाण यांची, तर व्हाइस चेअरमनपदी नंदा गव्हाणे यांची बिनविरोध निवड करण्यात आली.
सोसायटीच्या नुकत्याच झालेल्या निवडणुकीत गजपार्वतेश्वर शेतकरी विकास पॅनलने सर्व १३ पैकी १२ जागा जिंकल्या होत्या. यातील एक जागा राखीव राहिली, गुरुवारी संस्थेच्या चेअरमन व व्हाइस चेअरमनची निवड करण्यासाठी सहकार अधिकारी कांबळे यांच्या अध्यक्षतेखाली विशेष सभेचे आयोजन केले होते.
त्या वेळी प्रताप चव्हाण यांचा चेअरमनपदासाठी, तर नंदा गव्हाणे यांचा व्हाइस चेअरमनपदासाठी अर्ज प्राप्त झाल्याने त्यांची बिनविरोध निवड झाल्याचे जाहीर करण्यात आले. सभेला संचालक
तानाजी कुटे, सयाजी कुटे, अशोक कुटे, योगेश पठारे, बबन गांडेकर, साहेबराव गांडेकर, सतीश गुंडगळ, रोहिदास लोणारी, अपर्णा कानडे, अनिता पिंगळे उपस्थित होते. निवड झालेल्या नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचा नवनिर्वाचित संचालकांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
या वेळी सुरज बाबुराव कुटे, दादाराव कुटे, वसंत लोणारी, रामदास कुटे, सुरेश चव्हाण, नितीन चव्हाण, संदीप गांडेकर, किसन कुटे, लिंबाजी हरिभाऊ कुटे, संभाजी लोणारी आदींसह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. भोसे विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थेच्या चेअरमनपदी प्रताप सदाशिव चव्हाण यांची, तर व्हाइस चेअरमनपदी नंदा गव्हाणे यांची बिनविरोध निवड झाल्याबद्दल त्यांचे सर्वस्तरातून स्वागत होत आहे.
![](https://satyavichar.in/wp-content/uploads/2023/03/IMG-20230331-WA0001-461x1024.jpg)