महाळुंगे येथे रामजन्म सोहळा उत्साहात साजरा
राम जन्म सोहळ्यानिमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.
महाळुंगे येथे सालाबद प्रमाणे याही वर्षी गुढीपाडवा ते रामनवमी अंखड हरिनामाचा सप्ताहाचे आयोजन करण्यात होते. या सप्ताहाचे ८४ वे वर्षे आहे, हा सप्ताह अखंड व अविरत चालु आहे तसेच शिस्तिचे पालन हे या कार्यक्रमाचे वैशिष्ट्ये आहे. गेली नऊ दिवस विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन केले गेले होते. काकडा, हरिपाठ, भजन, प्रवचन, हरिकीर्तन, असे अनेक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.
गेली नऊ दिवस श्रीमद् भागवत या ग्रंथावर निरूपण ह.भ.प भारत महाराज यांनी केले
तसेच कलियुगामध्ये मानवी जीवनाचा सहजासहजी उद्धार आत्मकल्याण श्रीहरी ना माने श्री संत महात्म्याच्या वा:डमयाने होतो संत
संगतीमुळे मानवी जीवन तेजोमय प्रकाशमान होते याच विचाराने ती क्षेत्र महाळुंगे येथे अखंड हरिनाम सप्ताहाची सांगता झाली थोर महात्म्याने आपले ज्ञानदान हे कीर्तनाद्वारे भाविकांना श्रवण सुखाचा लाभ दिला गेला मोठ मोठ्या उच्च शिक्षित वक्त्यांची या ठिकाणी कीर्तन सेवा व प्रवचन सेवा झाली, श्रवण सुखाचा आनंद श्रोत्यांनी मोठ्या आनंदाने व उत्साहाने घेतला.
सप्ताहाला पंचकृषीतुन भाविकांची गर्दी मोठ्या संख्येने होती. सप्ताहाची सांगता म्हणजेच राम जन्माचे कीर्तन संत साहित्याचे गाड्या अभ्यासक वारकरी सांप्रदयाचे प्रचित ह.भ.प. सदानंद महाराज बग यांच्या सुमधुर वाणीतून झाले. श्रवण सुखाचा लाभ असंख्य भक्तगणांनी घेतला. यावेळी सकाळी काकडा, त्या नंतर श्रींना अभिषेक, आरती, हरीकीर्तन, व जन्मसोहळा झाल्यानंतर महाआरती व महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. राञी श्रीं च्या पालखीची भव्य दिव्य नगरप्रदक्षिणा होणार आहे असे संयोजकांनी सांगितले.
दरम्यान पंचकृषीतील नागरिक व मान्यवंर, ग्रामस्थ, वारकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.