Sant Nivruttinath : संत निवृत्तीनाथ संजीवन समाधी सोहळा उद्या दिमाखात साजरा हाेणार
सत्यविचार न्यूज :
संत निवृत्तिनाथ (Sant Nivruttinath) महाराजांनी वयाच्या चोवीसाव्या वर्षी संजीवन समाधी घेतली. त्यास उद्या ७२७ हून अधिक वर्षे पूर्ण होत आहेत. त्यानिमित्त निवृत्तिनाथ महाराज संजीवन समाधी (Sant Nivruttinath Palkhi) मंदिरात आणि नगर येथे विसावलेल्या नाथांच्या पालखीमध्ये हा सोहळा उत्साहात साजरा होणार आहे. संजीवन समाधी दिन ज्येष्ठ महिन्यात असतो आणि वारकरी नाथांची पालखी घेऊन पंढरपूरच्या (Pandharpur) दिशेने वाटचाल करीत असतात.
सकाळी १० ते १२ वाजता संजीवन समाधी सोहळा साजरा
तथापि, दरवर्षी संजीवन समाधी सोहळ्यावेळी पालखी नगर मुक्कामी असते. तेथेच सकाळी १० ते १२ वाजता संजीवन समाधी सोहळा साजरा केला जाणार आहे. त्र्यंबकेश्वरला संत निवृत्तिनाथ महाराज मंदिरात दुपारी १२ वाजता हा सोहळा साजरा केला जातो. या सोहळ्याची जय्यत तयारी करण्यात आली आहे. संजीवन समाधीला अभिषेक, कीर्तन, त्यानंतर आरती, पुष्पवृष्टी यांसह परंपरेने असलेले कार्यक्रम होतील.
वाहतूक कोंडी टाळण्यासाठी मार्गावरील वाहतुकीत बदल (Sant Nivruttinath)
संतश्रेष्ठ श्री निवृत्तिनाथ महाराज आषाढी वारी पालखी सोहळ्यानिमित्त वारकरी पंढरपूरच्या दिशेने रवाना होत आहे. पालखी सोहळ्यामध्ये हजारो वारकरी सहभागी झाल्याने नगर शहरात वाहतूक कोंडी टाळण्यासाठी पालखी मार्गावरील वाहतुकीत बदल केले आहेत. शहरातून जाणारी जड वाहतूक विळद बायपासवरून वळवण्यात येणार आहे, अशी माहिती शहर वाहतूक शाखेचे पाेलीस निरीक्षक माेरेश्वर पेन्द्राम यांनी दिली.