राज्यात पावसाचा जोर वाढणार; पुण्याच्या घाट परिसरात मुळसाधार पावसाची शक्यता
सत्यविचार न्यूज :
राज्यात मॉन्सूनचा जोर वाढणार आहे. पुढील काही दिवस कोकण, मध्य महाराष्ट्र, विदर्भात पावसाचा जोर वाढणार आहे. तर मुंबई आणि पुण्याच्या घाट विभागात देखील मुळसाधार पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. (Maharashtra Rains)
रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यांना पाच जुलैपर्यंत ऑरेंज आणि यलो अलर्ट देण्यात आला आहे. तर पुणे, कोल्हापूर, सातारा येथे यलो अलर्ट देण्यात आला आहे. विदर्भातील अकोला, अमरावती, भंडारा, बुलढाणा, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, नागपूर, वर्धा, वाशिम, यवतमाळ जिल्ह्यांना ५ जुलैपर्यंत यलो अलर्ट देण्यात आला आहे. (Maharashtra Monsoon)
महाराष्ट्र ते केरळ किनारपट्टीवर असलेला कमी दाबाचा पट्टा आज स्थिर आहे. कोकण व गोव्यात पुढील पाच ते सात दिवस बहुतांशी ठिकाणी, मध्य महाराष्ट्र व विदर्भात बऱ्याच ठिकाणी तर मराठवाड्यात काही ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे. नाशिक, कोल्हापूर व सातारा जिल्ह्यातील घाट क्षेत्रामध्ये तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. त्यामुळे या जिल्ह्यांना यलो अलर्ट देण्यात आला आहे.
विदर्भामध्ये पुढील पाचही दिवस मेघगर्जनेसह पाऊस पडण्याची शक्यता आहे. पालघर , रायगड व रत्नागिरी भागात तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे. पुणे व आजूबाजूच्या परिसरात चार ते पाच दिवस आकाश सामान्यतः ढगाळ राहून हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाच्या काही सरी पडण्याची शक्यता आहे. त्यामुळे घाट विभागासाठी यलो अलर्ट देण्यात आला आहे.