Maval LokSabha Election 2024 : महायुतीचे उमेदवार श्रीरंग बारणे, महाविकास आघाडीचे संजोग वाघेरे यांनी बजाविला मतदानाचा हक्क
सत्यविचार न्यूज :
मावळ लोकसभा मतदारसंघातील शिवसेना-भाजप-राष्ट्रवादी- मनसे- आरपीआय- रासप- मित्रपक्ष महायुतीचे (Maval LokSabha Election 2024) उमेदवार खासदार श्रीरंग बारणे आणि शिवसेना(उद्धव बाळासाहेब ठाकरे) महाविकास आघाडीचे उमेदवार संजोग वाघेरे यांनी मतदानाचा हक्क बजाविला.
खासदार बारणे यांनी पत्नी सरिता, पुत्र प्रताप व विश्वजीत, सून स्नेहा यांच्यासह मतदान केंद्रावर मतदानाचा हक्क बजाविला. थेरगावच्या संचेती प्राथमिक व माध्यमिक विद्यालय, दक्षिण उत्तर इमारत, तळमजला, दक्षिणेकडून खोली नंबर तीन (बूथ नं 218) या मतदान केंद्रावर मतदान केले.
वाघेरे यांनी पिंपरी वाघेरे, रयत शिक्षण संस्थेचे महात्मा फुले महाविद्यालय तळ मतदान केंद्र 310, खोली क्रं. 3 या ठिकाणी मतदान केले. त्यांच्या पत्नी उषा वाघेरे, पुत्र ऋषिकेश यांच्यासमवेत मतदान केंद्रावर मतदान (Maval LokSabha Election 2024) केले.