मालिनी शिंदे यांना समाजसेवा गौरव पुरस्कार
सत्यविचार न्यूज :
चाकण : प्रतिनिधी
निराधार, वंचित, पिडीत व घटस्पोटीत महिलांसाठी विशेष योगदान देणाऱ्या चाकण येथील प्रसिद्ध वकील व सामाजिक कार्यकर्त्या एड. मालिनी प्रितम शिंदे यांना अनिलभाऊ मोरे युवा मंचच्या वतीने समाजसेवा गौरव पुरस्कार देण्यात आला.
सत्काराच्या माध्यमातून समाजसेवेची आवड निर्माण व्हावी, हा उदात्त हेतू डोळ्यासमोर ठेवून येथील अनिलभाऊ मोरे युवा मंचच्या वतीने हे गौरव पुरस्कार देण्यात येतात. येथे आयोजित करण्यात आलेल्या पुरस्कार वितरण सोहळ्यात ऍड. मालिनी शिंदे यांना हा पुरस्कार सामाजिक कार्यकर्ते अनिल मोरे यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. समाजात चांगले काम करणाऱ्या व्यक्तींना सत्काराच्या माध्यमातून प्रोत्साहान मिळावे, व त्यांच्या हातून समाजाची अखंडितपणे सेवा घडावी, या हेतूने हे पुरस्कार दिले जातात. यावेळी नागेश शिंदे, गौतम वाघमारे, एड. प्रितम शिंदे, संदेश जाधव आदि उपस्थित होते. शाल, श्रीफळ, प्रमाणपत्र व स्मृतीचिन्ह असे या गौरव पुरस्काराचे स्वरूप होते. ऍड. शिंदे यांना हा पुरस्कार मिळाल्याबद्दल भाजपाचे जिल्हाध्यक्ष शरद बुट्टे पाटील, जिल्हा उपाध्यक्ष दत्तात्रय खांडेभराड, चाकणच्या माजी नगराध्यक्षा पूजा कड – चांदेरे, कडाचीवाडीच्या उपसरपंच रुपाली खांडेभराड, उद्योजक साहेबराव कड, राजगुरुनगर सहकारी बँकेचे संचालक रामदास धनवटे, ऍड. किरण झिंजुरके, उद्योजक मनोज मांजरे, भगवान मेदनकर, राजनभाई परदेशी, ऍड. नवनाथ भुजबळ आदींनी त्यांचे कौतुक केले.