भापसे पार्टीच्या पुणे जिल्हाध्यक्षपदी लक्ष्मण झाडे,.
सत्यविचार न्यूज :
चाकण : प्रतिनिधी
भापसे पार्टीच्या पुणे जिल्हाध्यक्षपदी उद्योजक लक्ष्मण झाडे यांची नियुक्ती करण्यात आली. भापसेचे पक्षप्रमुख दिपक ताटे यांनी त्यांची या पदावर बिनविरोध निवड केली.
येथे आयोजित करण्यात आलेल्या कार्यकर्त्यांच्या बैठकीत झाडे यांची पुणे जिल्हाध्यक्षपदी बिनविरोध निवड करण्यात आली. यावेळी भापसेचे युवक नेते धीरजकुमार ताटे, उद्योजक राजेश गौडा, रमेश गालफाडे, जालिंदर उपाडे, धनंजय ताटे, प्रवीण पाटोळे, अजय जगताप, नवनाथ झाडे, गणेश मारकड, अलका सुरवसे, सुनिता पवार, अपेक्षा भादवे, अर्चना नवगिरे, अयोध्या लोंढे, सुनिता गाडे आदि उपस्थित होते. याप्रसंगी झाडे यांचा पक्षप्रमुख ताटे यांच्या हस्ते नागरी सत्कार करण्यात आला. झाडे यावेळी म्हणाले,” भापसेने मला पदाच्या माध्यमातून काम करण्याची संधी दिली. पदाचा उपयोग मी योग्य कामासाठी व गरिबांचे प्रश्न सोडविण्यासाठी करणार आहे.”