Baramati : काटेवाडी मतदान केंद्रावर अजित पवार व सुनेत्रा पवार यांनी केले मतदान
सत्यविचार न्यूज :
काटेवाडी मतदान केंद्रावर उपमुख्यमंत्री अजित पवार (Baramati) यांनी आज सकाळीच मतदानाचा हक्क बजावला . उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पत्नी महायुतीच्या उमेदवार सुनेत्रा पवार व आई आशा पवार यांच्यासह मतदानाचा हक्क बजावला.
मतदान केल्यानंतर प्रतिक्रिया देताना अजित पवार म्हणाले, आज माझी आई माझ्यासोबत आहे. सहकुटुंब बारामतीच्या काटेवाडीत आम्ही मतदान केले. ही निवडणूक गावकी भावकीची नाही. आम्ही आमच्या परीने महायुतीच्या वतीने प्रचार केलेला आहे. प्रचारात अनेकांनी माझ्यावर आरोपांचा धुरळा उडवला. आम्ही विकासाच्या मुद्द्यावर ही निवडणूक लढवली आहे. बारामतीच्या सांगता सभेतही बारामतीकरांनी प्रचंड प्रतिसाद दिला. पुरंदर, दौंड, खडकवासला या सर्व भागात आम्ही जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहचण्याचा प्रयत्न (Baramati) केला .