Mahadev Jankar: महायुतीकडून महादेव जानकर यांना लोकसभेचे तिकीट मिळणार, सुनील तटकरे यांची घोषणा
सत्यविचार न्यूज – लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राजकीय घडामोडींना वेग (Mahadev Jankar)आला आहे.महायुतीची एक महत्त्वाची बैठक पार पडली. या बैठकीत रासप नेते महादेव जानकर महायुतीमध्येच राहणार असल्याची मोठी घोषणा सुनील तटकरे यांनी केली.
यावेळी त्यांनी राष्ट्रीय समाज पक्षाला एक जागा देणार असल्याचे जाहीर करण्यात आले आहे . यामुळे शरद पवारांना मोठा धक्का बसला आहे.
काही दिवसांपासून लोकसभा निवडणुकीसाठी राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष महादेव जानकर (Mahadev Jankar)हे तयारी करत होते. महादेव जानकर यांनी माढा लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवणार असल्याचे संकेत दिले होते. यानिमित्ताने महादेव जानकर यांनी शरद पवारांची भेट घेतली होती.
यावेळी शरद पवारांनी महाविकासआघाडीकडून त्यांच्यासाठी ही जागा सोडण्याची तयारी दर्शवली होती. पण आता महादेव जानकरांनी शरद पवारांना मोठा धक्का दिला आहे. आज झालेल्या महायुतीच्या बैठकीत महादेव जानकर यांना एक जागा देण्याचे निश्चित करण्यात आले आहे.