आळंदीसह नारायणगावात मोफत मराठा वधु वर मेळावा
सकल मराठा समाज व मराठा सोयरीक संस्थेचे आयोजन
आळंदी ( अर्जुन मेदनकर ) : येथील सकल मराठा समाज व मराठा सोयरीक संस्थेच्या वतीने पुणे जिल्ह्यातील नारायणगाव ( ता. जुन्नर ) आणि आळंदी ( ता.खेड ) या दोन ठिकाणी मोफत मराठा वधू वर परिचय मेळावे आयोजित केले असल्याची माहिती मराठा सोयरीक संस्थेचे अध्यक्ष अशोक पांडुरंग कुटे, सेवानिवृत्त वन अधिकारी प्रभाकर कड पाटील, शिवसेनेचे ( शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे ) माजी नगराध्यक्ष रोहिदास तापकीर, शिवसेना खेड समन्वयक उत्तम गोगावले यांनी दिली आहे.
दोन्ही मेळावे नेहमी प्रमाणे मोफत असून ८३ वा मेळावा नारायणगाव येथील निलायम गार्डन येथे शुक्रवारी ( दि. ८ ) ८४ वा मोफत मेळावा हा संत ज्ञानेश्वर यांच्या पावन भूमी म्हणजे आळंदी येथील ज्ञानसागर मंगल कार्यालय, वडगाव रोड येथे रविवारी ( दि. १० ) होणार आहे. दोन्ही मेळावे दुपारी बारा ते चार या वेळेत होणार आहे. जास्तीत जास्त वधु वर पालकांनी या मेळाव्यास सहभागी व्हावे असे आवाहन संस्थेच्या मार्गदर्शिका कविता बोंबले, मंगल राक्षे, आळंदी येथील ज्ञानसागर मंगल कार्यालयचे संचालक माऊली महाराज घोडके, अर्जुन मेदनकर, गोरख अनुभुले, अनिता झुजम, अमोल गांगर्डे, बबनराव कुऱ्हाडे, ज्ञानेश्वर घुंडरे, विलास घुंडरे, मयुर शिंदे, स्वप्नील देवळे, शिवसेनेचे शहर प्रमुख राहूल चव्हाण, प्रताप थोरवे, संजय काजळे, दत्तात्रय काजळे, भानुदास पऱ्हाड, कैलास थोरवे, बाळासाहेब ताये, किरण कड यांनी केले आहे.
आज काल मुलांना लग्नासाठी लवकर मुली मिळत नाही, लग्न जमत नाही. तसेच शेतकरी मुलांसोबत कोणीही लग्न करायला तयार होत नाही. आपले नातेवाईक, मित्र परिवार यांना देखील वेळ मिळत नसल्यामुळे कोणीही स्थळ दाखवण्यात आता मदत करत नाही. म्हणून अशा वधू वर मेळाव्यांची गरज पडत आहे. मराठा सोयरीक संस्थेने आतापर्यंत ८२ यशस्वी वधू वर मेळावे मोफत घेतले आहेत. या संस्थेकडून आतापर्यंत ३२०० लग्न पार पडलेले आहे. त्यापैकी ६०० लग्न हे विधवा, विदुर, घटस्फोटीत यांचे पार पडलेले आहेत. या मेळाव्यासाठी वधू- वरांनी स्वतः २ फोटो, बायोडाटा घेऊन पालकांसह यायचे आहे. अनेक वेगवेगळ्या तालुक्यातील व वेगवेगळ्या जिल्ह्यातील सर्व प्रकारचे स्थळे या ठिकाणी बघायला मिळणार आहेत. अधिक माहितीसाठी ७०२०२८१२८२ या नंबरवर संपर्क करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.