Maratha candidate for Loksabha Election : लोकसभेला मराठा उमेदवार खेड तालुक्यातून उभे करणार असल्याची माहिती समोर आली आहे.
Maratha candidate for Loksabha Election : सगेसोयरेंबाबतची मागणी अद्याप पूर्ण झाली नसल्याने मराठा समाज चांगलाच आक्रमक झालाय. महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यातून मराठा समाजाकडून उमेदवार (Maratha candidate) देण्याची तयारी सुरु झालीये.
खेड तालुक्यातून लोकसभेला निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक असलेल्या मराठा तरुणांनी सत्यविचार कडे यादी पाठवलली आहे.
Maratha candidate for Loksabha Election : सगेसोयरेंबाबतची मागणी अद्याप पूर्ण झाली नसल्याने मराठा समाज चांगलाच आक्रमक झालाय. पुणे जिल्ह्यातील खेड तालुका येथील मराठा समाजाकडून उमेदवार (Maratha candidate) देण्याची तयारी सुरु झालीये. मराठा तरुणांनी एकत्र येत हा निर्णय घेत असल्याचं सांगण्यात येत आहे,
मराठा आरक्षण (Maratha Reservation) प्रश्नावर खेड तालुक्यात सकल मराठा समाजाकडून असे काही सांगितले नसले तरी,
युवकांनी स्वयंस्फूर्तीने स्वतः विचार करत लोकसभा निवडणूक (Loksabha Election) लढवण्यासाठी प्रत्येक गावातून एक याप्रमाणे खेड तालुक्यातील प्रत्येक गावातून उमेदवार उभे करण्याचा निर्णय घेण्यात आला असल्याचे काही तरुणांनी सांगितले. तसेच मराठा आरक्षण प्रश्न मार्गी लागत नाही, तोपर्यंत राजकीय पक्षांच्या सर्व कार्यक्रमात वर बहिष्कार घालण्याचा निर्णय घेण्यात आलाय असे ही युवकांनी सांगितले