Chakan : तरुणाचा दगडाने ठेचून खून
सत्यविचार न्यूज – चाकण येथे दगडाने ठेचून तरुणाचा खून (Chakan) करण्यात आला. ही घटना मंगळवारी (दि. 27) पहाटे उघडकीस आली आहे. प्रणव लोंढे असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, दोन अल्पवयीन मुलांनी प्रणव याला दगडाने ठेचून ठार मारले. खून करत असताना मुलांनी व्हिडिओ बनवला. त्यानंतर तो व्हिडिओ त्यांनी सोशल मीडियावर व्हायरल केला.
याबाबत माहिती मिळाल्यानंतर चाकण पोलिसांनी दोन्ही अल्पवयीन मुलांना ताब्यात घेतले. त्यानंतर त्यांनी सोशल मीडियावर अपलोड केलेला व्हिडिओ पोलिसांनी डिलीट केला. चाकण पोलीस तपास करीत (Chakan) आहेत.