Pune : वसंत मोरे यांनी घेतली शरद पवार यांची भेट; खमंग चर्चांना उधाण
सत्यविचार न्यूज – मनसेचे (Pune) माजी नगरसेवक वसंत मोरे यांनी आज शरद पवार यांची भेट घेतली. त्यामुळे खमंग चर्चांना उधाण आले आहे. पवार यांच्या भेटीनंतर वसंत मोरे म्हणाले, कात्रज डेअरीच्या मागील बाजूस असलेल्या जागेत पुणे महापालिका आयुक्तांमार्फत चुकीचे आरक्षण टाकण्यात आले आहे. त्या संदर्भात सह्यांची मोहीम हाती घेऊन नागरिकांमध्ये प्रबोधन केले जात आहे. तसेच उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे देखील हा प्रश्न मांडला.
पण काही मार्ग निघाला नाही. त्यानंतर बारामती लोकसभा मतदारसंघ हा कात्रज भागात येतो. त्यामुळे खासदार सुप्रिया सुळे यांना भेटण्यास आलो होतो. त्यावेळी शरद पवार यांची भेट झाली आणि त्यांना देखील निवेदन दिले. या प्रश्नावर लक्ष घालून मार्ग काढला जाईल, असे शरद पवार म्हणाले.
दरम्यान, आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मोरे आणि पवार भेट महत्वपूर्ण (Pune) मानली जात आहे. मोरे हे पुणे लोकसभा निवडणुकीसाठी इच्छुक आहेत. त्यामुळे त्यांनी पवार यांची घेतलेली भेट महत्वपूर्ण आल्याचे बोलले जात आहे.