सह्याद्री स्कूल आळंदीत शिवजन्मोत्सव उत्साहात साजरा
सत्यविचार न्युज :
आळंदी येथील अभिनव एज्युकेशन सोसायटी संचलित सह्याद्री इंटरनॅशनल स्कूल आळंदीत शिवजयंती उत्सव उत्साहात साजरा करण्यात आला. श्री छत्रपती शिवाजी महाराज जयंती महाराष्ट्रात सणा प्रमाणे साजरी केली जाते. हा सण स्वराज्याचे संस्थापक श्री छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जन्म दिना निमित्त दरवर्षी साजरा केला जातो. यावर्षी देखील श्री छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्मोत्सव सह्याद्री स्कूलमध्ये उत्साहात साजरा करण्यात आला.
या निमित्त अभिनव एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष गणेश गरुड यांनी श्री छत्रपतींच्या मूर्तींचे पूजन केले. यावेळी उद्योजक राम गावडे, भागवत आवटे, उपाध्यक्ष सुरेश लोखंडे, संचालक बाबाजी काळे, खजिनदार सचिन मेथे, शाळेच्या मुख्याध्यापिका प्रियांका लांडे आदी उपस्थित होते. छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनपटावर आधारित विविध प्रसंग विद्यार्थ्यांनी त्यांच्या पोवाडातून भाषणातून व नाट्यातून सादर केले. यावेळी काही विद्यार्थ्यांनी भाषणे देखील केली. काही विद्यार्थ्यांनी भाषण, पोवाडे, नृत्य व नाटिका सादर केल्या. यावेळी सर्व मुलींनी नऊवारी साडी, फेटा कुर्ता पायजमा मावळा ड्रेस छत्रपती शिवाजी महाराजांच्या राजदरबारातील विविध व्यक्तींची पारंपारिक वेशभूषा केली. विविध सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले. अध्यक्ष गणेश गरुड यांनी विद्यार्थी, पालक, शिक्षक यांना मार्गदर्शन केले. राम गावडे, भागवत आवटे यांनी शाळेत दिले जाणाऱ्या संस्कार व मुलांचे कौतुक केले. या कार्यक्रमास पालकांनी उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदविला. या कार्यक्रमाचे नियोजन स्कूलच्या प्रिन्सिपल प्रियांका लांडे, अश्विनी पवार,अर्चना भोसले, सुरेखा लोटके, ऋतुजा खैरे, सुजाता पालकर, कविता कवाद, रूपाली वंजारी, हर्षाली पाटील, नैना जाधव, प्रियांका कांबळे, सुजाता पालकर, अर्चना ढगेकर यांनी केले. सूत्रसंचालन चैताली महाजन यांनी केले.