ज्ञानेश्वर विद्यालय आळंदीत बारावीचे मुलांना निरोप
सत्यविचार न्युज:
आळंदी येथील श्री ज्ञानेश्वर शिक्षण संस्थेत इयत्ता बारावीच्या विद्यार्थ्यांना बोर्ड परीक्षेला सामोरे जात असताना श्री ज्ञानेश्वर विद्यालय व ज्युनिअर कॉलेजच्या विद्यार्थ्यांसाठी शुभेच्छा समारंभाचे उत्साहात आयोजन करण्यात आले. यावेळी मुलांना निरोप देत पुढील वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या.
या प्रसंगी ह.भ.प. संदीप महाराज लोहोर, सहाय्यक पोलीस निरीक्षक आळंदी अनिल लोहार, ज्ञानेश्वर शिक्षण संस्थेचे सचिव अजित वडगावकर, मुख्याध्यापक दिपक मुंगसे, उपमुख्याध्यापक सूर्यकांत मुंगसे, पर्यवेक्षक किसन राठोड उपस्थित होते.
यावेळी अनिल लोहार यांनी १२ वीच्या विद्यार्थ्यांना जीवनाच्या Turning Point बद्दल मार्गदर्शन केले. जीवनात जिद्द आणि चिकाटी असेल तर मनुष्य प्रचंड मेहनत घेऊन जीवनात यशस्वी होऊ शकतो. पूर्वीच्या मुलांना शिक्षणाच्या एवढ्या संधींची माहिती उपलब्ध नव्हती व परंतु आधुनिक जगात विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या नवनवीन संधी व विविध क्षेत्रात प्रगती करता येऊ शकते यावर मार्गदर्शन केले. अजित वडगावकर यांनी विद्यार्थ्यांना आई वडिलांचे स्वप्न पूर्ण करण्याचा प्रयत्न करा असे सांगून विद्यार्थ्यांना परीक्षेसाठी शुभेच्छा दिल्या. दीपक मुंगसे यांनी जीवनामध्ये वाटचाल करत असताना डोळ्यासमोर ध्येय ठेवणे व त्या दृष्टीने कार्य करणे गरजेचे असल्याचे सांगितले. पर्यवेक्षक किसन राठोड, शुभांगी जगनाडे यांनी विद्यार्थ्यांना कौशल्यपूर्ण जीवन जगण्याबद्दल मार्गदर्शन करत शुभेच्छा दिल्या. अध्यक्षीय भाषणात संदीप महाराज लोहोर यांनी विद्यार्थ्यांना एकपाठी असावे, बारावी नंतर विद्यार्थ्यांना जीवनात नवीन नवीन संधी येत असतात, त्या संधीचे सोने करावे तसेच विद्यार्थ्यांनी जीवनात उत्तुंग यश प्राप्त करून यशाचे शिखर गाठावे असे मत व्यक्त केले. तसेच आपण आयुष्यभर विद्यार्थी म्हणून जीवन जगावे जे ज्ञान मिळेल ते आत्मसात करण्यास आवाहन केले. शितल बागडे यांनी प्रास्ताविक केले.
सूत्रसंचालन विकास शिवले यांनी केले. आभार सुप्रिया फडके यांनी मानले. पसायदानाने कार्यक्रमाची सांगता झाली.